आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tyson Gay News In Marathi, Athelate, Divya Marathi

उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने अमेरिकेचा धावपटू टायसनवर वर्षभराची बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलोरॅडो स्प्रिंग्ज - अमेरिकेचा जगविख्यात धावपटू टायसन गे उत्तेजक द्रव्यचाचणीत दोषी आढळल्याने अमेरिकेच्या उत्तेजकविरोधी संघटनेने (यूएसएडीए) त्याच्यावर एक वर्षाची बंदीची कारवाई केली आहे. तसेच त्याला लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक परत करण्याचे आदेश दिले.
यूएसएडीएने त्याबाबतची अधिकृत घोेषणा केल्यानंतर गे याने त्याचे ऑलिम्पिक पदक अमेरिकन ऑलिम्पिक कमिटीकडे सुपूर्द केले. अ‍ॅनाबोलिक स्टेरॉइड नामक बंदी घातलेले उत्तेजक त्याच्या मूत्रचाचणीत दोन वेळा आढळले. प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान तसेच स्पर्धेपूर्वी घेतलेल्या उत्तेजक द्रव्यचाचणीत आढळून आले होते. त्याची मूत्र तपासणी करण्यात आल्यापासूनच ही बंदी लागू करण्यात आली असून गतवर्षी 23 जूनपासून ती लागू करण्यात आली आहे.

सर्व स्पर्धांपासून दूर : या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर गेने मी हेतुपूर्वक कोणतेही उत्तेजक घेतले नसल्याचे जनतेला सांगितले होते. तसेच त्याने दहा महिन्यांपासून सर्व स्पर्धांपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. तसेच त्याने यूएसएडीएच्या सर्व चौकशीला सहकार्य करण्याचीच भूमिका नेहमी घेतली आहे. त्यामुळेच संघटनेने 2 वर्षे बंदीची शिक्षा एक वर्षावर आणली. गेने 2009 मध्ये झालेल्या शांघायच्या 100 मीटर स्पर्धेत 9.69 सेकंद अशी वेळ दिल्याने तो आजही बोल्टच्या खालोखाल कमी वेळ देणा-यांमधील जगातील दुस-या क्रमांकाचा धावपटू म्हणून गणला जातो.

आणखी एक विक्रमदेखील नामशेष
टायसन गेने लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 9.80 सेकंद अशी वेळ देत चौथा क्रमांक पटकावला होता. इतका कमी वेळ देऊनही पदक न मिळाल्याने ऑलिम्पिकच्या इतिहासातील तोदेखील एक विक्रम होता. त्यामुळे हा विक्रमदेखील आता इतिहासजमा झाला आहे.

अन् बंदी एका वर्षाची
टायसन गेवर 2 वर्षे बंदी घालण्यात येणार होती, मात्र चौकशीला प्रतिसाद न मिळाल्याने ती बंदी एक वर्ष झाली.