आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • UK Firm Honours Sachin Tendulkar With Rare Coin, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनच्‍या सन्‍मानासाठी ब्रिटीश कंपनीने काढली 'सोन्‍याची नाणी', किंमत 12 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटविश्वातला दिग्गज सचिन तेंडूलकर याला ब्रिटनच्या सामान निर्माता कंपनी ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्या नावावर सोन्याची नाणी काढून सन्मान जाहीर केला आहे.तसेच एका विशिष्ट सोन्याच्या नाण्याची किंमत 12,000 पौंड स्टर्लिंग (अंदाजे 12 लाख 30 हजार रुपये) आहे. सचिनच्या 24 वर्षाच्या सुवर्ण कारकिर्दीच्या सन्मानार्थ हे पाऊल उचलण्यात आले आहे.
काढली 210 नाणी
लंडनच्या ईस्ट इंडिया कंपनीने सांगितले, सचिनच्या सन्मानार्थ जागतिक स्तरावर फक्त 210 सोन्याची नाणी काढली आहेत. प्रत्येकाचे 200 ग्राम वजन आहे. काही लोकांनाच ही नाणी बघता येतील. हजारो चाहत्यांसाठी ही नाणी दुर्मिळ ठरणार आहेत.

तसेच यातलं प्रत्येक नाणं विशेष आहे. याला एका विशेष बॉक्समध्ये ठेवण्यात येणार आहे. या शिक्क्यासोबत प्रमाणपत्र आणि सचिनची सही असलेली बॅट देण्यात येणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सचिन काय म्‍हटला...