आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Umar Akmal Wedding With Abdul Qadir Daughter In Controversy News In Marathi

सहा लाखांची शेरवानी घालणाऱ्या पाक क्रिकेटपटूचा विवाह ठरला वादग्रस्‍त, बघा नवदांपत्‍याचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - पाकिस्‍तानचा स्‍टार फलंदाज उमर अकमलचा बुधवारी विवाह संपन्‍न झाला. अकमलने विवाहासाठी 6 लाख रुपयांचा शेरवानी परिधान केली होती. त्‍याच्‍या चाहत्‍यानी ट्विटरवर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये लग्‍नादरम्‍यान 'बेबी डॉल मैं सोने दी...' या गाण्‍यावर अकमलने नृत्‍यही केले आहे. पंतु हे लग्‍न विवादास्‍पद ठरले आहे.

अकमल आणि त्‍याच्‍या परिवारावर पंजाब सरकारचा लग्‍न समारंभ कायद्याचे उल्‍लंघन केल्‍याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार उमर आणि त्‍याच्‍या परिवाराने मंगळवारी रात्री लाहोर स्थित फॉर्महाऊसवर झालेल्‍या रस्‍म-ए-हिना वेळी माध्‍यमांशी गैरवर्तनुक केल्‍याचाही आरोप आहे.

पाकिस्‍तानी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पाकिस्‍तानमध्‍ये होणारे सर्व लग्‍न समारंभ रात्री 10 वाजेच्‍या पूर्वी संपतात. परंतु रात्री दहाच्‍या नंतरही अकमलाचा लग्‍न समारंभ सुरु होता. त्‍यामुळे त्‍यावर कारवाई केली जाणार आहे.

पुढील स्‍लाइडमध्‍ये पाहा, नवदांपत्‍याची काही खास छायाचित्रे..