आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Umesh Yadav And Shikhar Dhawan Combined To Take A Brilliant Catch

VIDEO : शिखर धवन आणि उमेश यादवने मिळून घेतली अफलातून कॅच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारपासून विश्‍वचषकाला सुरुवात होत आहे. क्रिकेटच्‍या या महाकुंभात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आदी सर्वच प्रकारात विक्रम होणार आहेत. क्रीडाप्रेमींना अनोखा आयाम, अनोखी शैली पाहायला मिळणार आहे. त्‍याचाच एक नमुना भारत-अफगाणिस्‍तान यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये दिसून आला. शिखर धवन आणि उमेश यादवने मिळून अफलातून कॅच घेतला.
(फोटो - कॅच घेण्‍यासाठी झेप घेताना शिखर धवन)
21 व्‍या षटकात झाले सर्वकाही
अफगानिस्तान प्रत्‍युत्‍तरादाखल फलंदाजी करीत असताना 21 व्‍या षटकात रवींद्र जडेजाने उस्‍मान घनीला टाकलेल्‍या चेंडूवर शॉट लागून चेंडू उडाला. मिडविकेटला शिखर धवन क्षेत्ररक्षण करत होता. लॉंग ऑनहून उमेश यादव पळत आला आणि दोघांमिळून त्‍यांनी झेल घेतला.
...आणि पडला धवन
धवनने झेप घेऊन बॉल कॅच करण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, चेंडू त्‍याच्‍या हातून उडाला. अशा वेळी उमेश यादवने तो झेल टिपला. आणि विश्‍वचषकाआधीच श्रेत्ररक्षणाचा अफलातून नमुना पाहायला मिळाला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, VIDEO