आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायडरचे खेळणे अद्याप अनिश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - न्यूझीलंडचा जेसी रायडरचा आगामी सीपीएलमधील (कॅरेबियन प्रीमियर लीग) सहभाग अद्याप अनिश्चित आहे. गेल्या महिन्यात त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. यामधून तो अद्याप पूर्णपणे सावरला नाही. या दुखापतीमुळे तो आयपीएल-6 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. रायडरने सीपीएलच्या आयोजकांशी संपर्क साधला आहे आणि तो येत्या काही दिवसांमध्ये फिट होणार असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र, हे वृत्त रायडरचे मॅनेजर एरोन ली यांनी फेटाळून लावले.