आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांखालील वर्ल्डकप :11 ते 26 ऑगस्टदरम्यान ऑस्ट्रेलियात रंगणार स्पर्धा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येत्या 11 ते 26 ऑगस्टदरम्यान ऑस्ट्रेलियात होणार्‍या 19 वर्षांखालील खेळाडूंच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पध्रेसाठी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) 16 संघांची घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा क्विन्सलँड येथे होणार आहे. भारताने दोन वेळा या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले आहे. यंदा उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झुंज देणार आहे. भारतीय युवा संघात जालन्याचा विजय झोल आणि उस्मानाबादचा मोहसीन सय्यद यांचाही समावेश आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या 16 संघांत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नामिबिया, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान, पापू न्यू गुयाना, स्कॉटलँड, द. आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये न्यूझीलंडच्या लिंक्क्लोन येथे झालेल्या विश्वचषकात विजेतेपद पटकावले होते. यंदा घरच्या प्रेक्षकांसमोर विजय मिळवण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलियाची युवा टीम जोरदार प्रयत्न करील. दुसरीकडे पाकिस्तानची टीमही तिसर्‍यांदा युवा खेळाडूंच्या स्पध्रेचे विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करील. पाकिस्तानने यापूर्वी 2004 आणि 2006 मध्ये अनुक्रमे बांगलादेश आणि र्शीलंकेत झालेल्या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले होते. भारतानेसुद्धा 19 वर्षांखालील गटाचे दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2002 मध्ये मोहम्मद कैफ कर्णधार आणि युवराजसिंग संघात असताना र्शीलंकेत पहिल्यांदा भारतीय युवा टीमने विश्वचषक जिंकला होता.
स्पध्रेत सहभागी होणारा भारतीय संघ - उन्मुक्त चंद (कर्णधार), बाबा अपराजित, प्रशांत चोप्रा, संदिपान दास, अखिल हेरवाडकर, रुष कलारिया, विकास मिर्शा, अक्षदीप नाथ, कमाल पस्सी, समित पटेल, मोहसीन सय्यद, संदीप शर्मा, हरमितसिंग, मनन वोहरा, विजय झोल.
16 संघांचा चार गटांत समावेश
48 एकूण सामने स्पध्रेत रंगणार. यात पहिल्या फेरीचे 24, सुपर लीगचे 12 आणि प्लेट चॅम्पियनशिपचे 12 सामने होतील.
08 वेगवेगळ्या स्थळांवर स्पध्रेचा थरार.
भारतीय संघ आहे मजबूत- या स्पध्रेत सहभागी होत असलेला युवा भारतीय संघ मजबूत आहे. दिल्लीचा सलामीवीर असलेल्या उन्मुक्त चंदने प्रथम र्शेणीच्या 11 सामन्यांत 738 धावा ठोकल्या आहेत. महाराष्ट्राचा युवा फलंदाज विजय झोलने 451 धावांची खेळी करून देशभर नाव कमवले होते. विजयने 19 वर्षांखालील आशिया चषकातही दमदार कामगिरी केली होती. मो. सय्यदची वेगवान गोलंदाजी भारतासाठी लाभदायक ठरू शकेल. शिवाय तामिळनाडूचा फलंदाज बाबा अपराजित, डावखुरा फिरकीपटू हरमितसिंग, सलामीवीर अखिल हेरवाडकर, संदीप शर्मा, मनन वोहरा आणि फिरकीपटू विकास मिर्शा यांच्या समावेशामुळे टीम मजबूत झाली आहे.