आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under 19 Tri Series: Indian Youth Team Won Seris

19 वर्षांखालील तिरंगी मालिका: भारतीय युवा टीमने जिंकली मालिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डार्विन - वेस्ट इंडीजमध्ये टीम इंडियाने मालिका जिंकल्यानंतर अवघ्या काही तासांत ऑस्ट्रेलियात विजय झोलच्या नेतृत्वाखाली युवा संघाने 19 वर्षांखालील तिरंगी मालिका आपल्या नावे केली. भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर 8 गड्यांनी मात केली.यासह दुस-यांदा तिरंगी मालिका भारताने जिंकली. कांगारूंच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 75 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 15.3 षटकांत लक्ष्य गाठले. भारताचा दीपक हुड्डा सामनावीर आणि कर्णधार विजय झोल मालिकावीर ठरला. धावांचा पाठलाग करणा-या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. हेरवाडकर (0) व कर्णधार विजय झोल (9) हे स्वस्तात बाद झाले. अखेर अंकुशने नाबाद 40 आणि संजू सॅमसनने नाबाद 20 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू शॉर्टने 25 धावा काढल्या. तसेच जॅक डोरानने 13 व मोर्टिमरने दहा धावांची खेळी केली. यासह कांगारूचे इतर फलंदाज अपयशी ठरले.भारताकडून दीपकने तीन, मिलिंद दोन गडी बाद केले. कुलदीपने दोन षटकांत चार धावा देऊन दोन विकेट घेतल्या.


विजय झोल चमकला
धावा विरुद्ध संघ दिनांक
46 ऑस्ट्रेलिया (2 जुलै)
128 न्यूझीलंड (4 जुलै)
64 ऑस्ट्रेलिया (8 जुलै)
46* न्यूझीलंड (10 जुलै)
09 ऑस्ट्रेलिया (12 जुलै)


भारताचा विजयी प्रवास
दिनांक विरुद्ध विजय निकाल
2 जुलै ऑस्ट्रेलिया 47 धावांनी
4 जुलै न्यूझीलंड 165 धावांनी
8 जुलै ऑस्ट्रेलिया 7 गड्यांनी
10 जुलै न्यूझीलंड 7 गड्यांनी
12 जुलै ऑस्ट्रेलिया 8 गड्यांनी