आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under 19 World Cup: South Africa Beat Pakistan In Final

अंडर-19 विश्वचषक : आफ्रिका चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - कर्णधार मारक्रमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका युवा संघाने शनिवारी आयसीसी 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक पटकावला. आफ्रिकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या युवा संघाचा 6 गड्यांनी पराभव केला. चार बळी घेणारा कोर्बिन बोस्च सामनावीर आणि कर्णधार मारक्रम मालिकावीर ठरला.

मारक्रम (नाबाद 66) व जी. ओल्डफील्ड (40) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 44.3 षटकांत 131 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेने 42.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करणार्‍या आफ्रिकेची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर फोर्टुन (1) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर जे. स्मिथ 9 धावा काढून तंबूत परतला. त्याला करामत अलीने बाद केले. अखेर चौथ्या क्रमांकावर आलेल्या ओल्डफील्डने संघाची बाजू सावरली. त्याने सलामीवीर व कर्णधार मारक्रमसोबत 71 धावांची भागीदारी केली. दरम्यान, करामत अलीने ही जोडी फोडली. त्याने ओल्डफील्डला सैफुल्लाहकरवी झेलबाद केले. ओल्डफील्डने 68 चेंडूंत 40 धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान : सर्वबाद 131,
दक्षिण आफ्रिका : 4 बाद 134

बोस्चचा बळींचा चौकार
तत्पूर्वी, बोस्च (4/15), डिल (2/29) आणि वाल्ली (2/19) यांनी पाकला 44.3 षटकांत अवघ्या 131 धावांत गुंडाळले. पाककडून अमद बटने सर्वाधिक 37 धावा काढल्या.