आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under Pressure, You Tend To Miss Dhoni, Says Kohli

विंडीजविरूद्धच्‍या सामन्‍यात दबावावेळी धोनीची कमतरता जाणवली- विराट कोहली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग्‍सटन- विंडीजमध्‍ये सुरू असलेल्‍या तिरंगी क्रिकेट स्‍पर्धेत पहिल्‍याच सामन्‍यात टीम इंडियाला यजमानांकडून पराभव स्‍वीकारावा लागला. टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार विराट कोहलीने दबावावेळी धोनीची कमतरता जाणवल्‍याचे म्‍हटले आहे.

फलंदाजी करताना मासपेशी ताणल्‍या गेल्‍यामुळे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मैदानातून बाहेर व्‍हावे लागले. त्‍यामुळे संघाचे नेतृत्‍व विराट कोहलीने केले. जेव्‍हा दबाव येतो त्‍यावेळी धोनीची कमतरता जाणवते. तो दबावावेळीही अत्‍यंत शांत असतो, असे कोहलीने म्‍हटले.

विंडीजची फलंदाजी सुरू झाल्‍यानंतर विकेटमध्‍ये बदल झाला. दुस-या डावात विंडीजचे फलंदाज ज्‍यापद्धतीने फलंदाजी करीत होते. ते पाहता आम्‍ही केलेल्‍या धावा पुरेशा नव्‍हत्‍या. आमची फलंदाजी असताना विकेटचे रूप पूर्णपणे वेगळे होते. सुरूवातीला दव होते. नंतर मात्र विकेट फलंदाजांना मदत करणारी ठरली, असे कोहली म्‍हणाला.

गोलंदाजांचे कौतुक करताना तो म्‍हणाला, गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली. पण खराब क्षेत्ररक्षणामुळे आमची निराशा झाली. आमच्‍या क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडले. आम्‍ही जास्‍तीत जास्‍त विकेट घेण्‍याचा प्रयत्‍न केला.