आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या नेतृत्वात भारत शिखरावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल न्यूज रूम - कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा गौरव दिवसेंदिवस वाढत आहे. तो जगातला असा एकमेव कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा ट्वेंटी-20 वर्ल्डकप (2007), वनडे वर्ल्डकप (2011) आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) जिंकण्याचा पराक्रम केला आहे. सौरव गांगुलीनंतर धोनीच सर्वाधिक यशस्वी भारतीय कर्णधार असल्याचे मानले जात आहे.


धोनीचे दणदणीत यश
धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकपचे विजेतेपद. १ 2009 मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान. १ 2011 मध्ये भारताने 28 वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला. १2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर ताबा मिळवला.


विजेत्या संघाचे खेळाडू करोडपती
भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपयांचा रोख पुरस्कार भारतीय क्रिकेट बोर्डाने जाहीर केला आहे. भारतीय संघासोबत गेलेल्या ‘सपोर्ट स्टाफ’मधील सदस्यांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचे बक्षीसही बीसीसीआयने जाहीर केले आहे.


पाँटिंगला मागे टाकले
संघाचा कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या नेतृÞत्वात दोन वर्ल्डकप (2003, 2007) आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी (2006, 2009) चे विजेतेपद जिंकले होते. मात्र, त्याच्या खात्यात टी-20 वर्ल्डकपचा किताब आला नाही. दुसरीकडे धोनीने भारताला टी-20 चॅम्पियन बनवले होते.


विदेशात विजयाचे अर्धशतक
विदेशी भूमीवर 51 विजयासह धोनीने मो. अझहरुद्दीनला (50 विजय) मागे टाकले. यात सौरव गांगुली 58 विजयासह सर्वांत पुढे आहे.


धोनीने केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
ऑस्ट्रेलियाने 2006 मध्ये रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. नंतर पुढच्या वर्षी 2007 मध्ये वेस्ट इंडीज येथे झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्येही बाजी मारली होती. भारताने 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप जिंकला आणि आता त्याच्याच नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.


शिखर धवनचा विक्रम
धवनने स्पर्धेत 90.75 च्या सरासरीने दोन शतके व एका अर्धशतकासह 363 धावा काढल्या. त्याने गांगुलीच्या 2000-2001 मध्ये चार सामन्यातील 348 धावांच्या विक्रमाला मागे टाकले. यासह त्याने आयसीसी वन डे क्रमवारीत 29 वे स्थान गाठले.


पुरस्कार भाविकांना समर्पित : धवन
प्लेअर ऑफ सिरीजचा पुरस्कार स्वीकारताना शिखर धवनने म्हटले की हा अवॉर्ड उत्तराखंडमधील संकटात प्रभावित झालेल्या भाविकांना समर्पित आहे. मी त्या सर्वांच्या दु:खासोबत आहे. सर्वांना अडचणींचा सामना करण्याचे बळ मिळो.


दिग्गज म्हणतात...धोनीच्या नेतृत्वातील हा उत्तम संघ !
राखेतून उठण्याची कला धोनीला अवगत आहे. त्याने संघातील युवांत नवा जोश भरला आहे. हा एक उत्तम संघ आहे. टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने विजय मिळवला, त्यावरून त्यांचे विचार चॅम्पियनसारखे आहेत, असे वाटते.
सुनील गावसकर, माजी कर्णधार.


1983 मध्येसुद्धा भारताने कमी स्कोअरनंतर सामना जिंकला होता. त्याचप्रमाणे या वेळीसुद्धा आपल्या संघाने दबावात चांगला खेळ केला. यामुळे बर्मिंगहॅम येथे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 1983 च्या वर्ल्डकपचा विजय ब-यापैकी समान आहे.
चंदू बोर्डे, माजी कर्णधार.


हा एक शानदार विजय आहे. धोनी दमदार कर्णधार आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड नसताना धोनीने संघाला बांधून ठेवले. महेंद्रसिंग धोनी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे. संपूर्ण संघाचा हा विजय आहे.
अजित वाडेकर, माजी कर्णधार.


धोनीच्या नेतृत्वात प्रमुख विजय
2007 : टी-20 वर्ल्डकप
2008 : सीबी सिरीज
2009 : कॉपेक चषक
2010 : आशिया चषक
2011 : वनडे वर्ल्डकप
2013 : चॅम्पियन्स ट्रॉफी


कर्णधार धोनीने दिला विजयासाठी खास मंत्र
० वर्ल्डकप विजेता असल्याने त्या लौकिकानुसारच कामगिरी करावी.
० सामन्याला ट्वेंटी-20 समजून खेळा.
० आकाशातील काळे ढग किंवा विरोधी संघाकडे पाहण्याची गरज नाही. खेळावर लक्ष द्या.
० देव त्यांचीच मदत करतो, जो स्वत:ची मदत करतो. यामुळे विजयासाठी स्वत: प्रयत्न करा.


स्पर्धेतील टॉप-5 फलंदाज
खेळाडू सामने धावा 100/50
शिखर धवन 05 363 2/1
जोनाथन ट्रॉट 05 229 0/2
कुमार संगकारा 04 222 1/1
रोहित शर्मा 05 177 0/2
विराट कोहली 05 176 0/1


स्पर्धेतील टॉप-5 गोलंदाज
खेळाडू सामने विकेट
रवींद्र जडेजा 05 12
मॅक्लानघन 03 11
जेम्स अँडरसन 05 11
इशांत शर्मा 05 10
आर. मॅक्लारेन 04 08