आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटविश्वासाठी अविस्मरणीय निरोप सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शनिवार दुपारी 12.15ची वेळ... अवघे क्रिकेटविश्व आणि देशासोबत जणू काळही सचिनला निरोप देत होता...काही क्षणांसाठी तोही थांबला होता. 25 मिनिटांपर्यंत सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या... 24 वर्षांची आपली कहाणी ऐकवली...या वेळी कोणीच घड्याळाच्या काट्याकडे बघितले नाही...तो बोलत गेला आणि पूर्ण मैदान, पूर्ण देश अश्रू ढाळू लागला...
विंडीजचा शेवटचा गडी बाद होताच सर्व प्रेक्षक उभे राहिले. प्रत्येक जण भावूक झाला होता. अंजली, अर्जुन आणि साराच नव्हे, तर द्रविड, लक्ष्मण, गांगुली आणि युवराजलाही अश्रू आवरणे कठीण झाले होते. सचिनला आधीच माहीत होते की, आपल्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून त्याने आधीच टोपी घातली होती. देव कधी रडत नाही, असे ऐकले होते; पण या क्रिकेटच्या या देवाने टोपीच्या आडोशाने अश्रू लपवले. कदाचित त्याला रडणारा चेहरा कोणालाच दाखवायचा नव्हता. विंडीजचा डाव संपताच तो पॅव्हेलियनकडे परतला.
सचिनचे भाषण संपताच धोनी व कोहलीने सचिनला खांद्यावर उचलले आणि संघातील सर्व सहका-यांनी एक-एक करत मैदानभर फिरवले. मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारल्यानंतर सर्व खेळाडू मैदानातून बाहेर जाऊ लागले. इतक्यात
सचिन परत फिरला आणि पिचवर गेला. 24 वर्षांचे आयुष्य ज्या 22 यार्डांच्या पिचवर घालवले त्या पिचला शेवटचा नमस्कार करून मैदान सोडले.
...अन् अशा त-हेने सचिन निवृत्त झाला. हा क्षण आठवून अवघे क्रिकेटविश्व या गोष्टीचा अभिमान बाळगेल की, एखाद्या क्रिकेटपटूची अशा प्रकारेही निवृत्ती होऊ शकते.