आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North East United Defeated Keral Blaster In Indian Super League Football

इंडियन सुपर लीग फुटबॉल : नॉर्थ-ईस्ट युनायटेडची विजयी सलामी; केरळा ब्लास्टर्सचा पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात युनायटेड व केरळाच्या खेळाडूंमधील चुरस.
गुवाहाटी - जॉन अब्राहमच्या नॉर्थ-ईस्ट युनायटेडने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आपल्या विजयी मोहिमेचा दमदार शुभारंभ केला. या संघाने सोमवारी झालेल्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या केरळा ब्लास्टर्सचा धुव्वा उडवला. युनायटेडने रंगतदार लढतीत १-० अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. यासह या संघाने लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. स्पेनचा स्टार खेळाडू कोके ऊर्फ सर्जियो पाड्रोने केलेल्या शानदार गोलच्या बळावर नॉर्थ-ईस्ट युनायटेडने सामना जिंकला.

युनायटेड संघाने दमदार सुरुवात करताना केरळा ब्लास्टर्सच्या खेळाडूंना चांगलेच झुंजवले. मात्र, केरळाच्या गोलरक्षकाने उल्लेखनीय कामगिरी करताना युनायटेडचे गोलचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे ४४ व्या मिनिटांपर्यंत ही लढत शून्य गोलने बरोबरीत होती. अखेर मध्यंतरापूर्वी कोकेने गोलचा धमाका उडवला. त्याने ४५ व्या मिनिटाला शानदार गोल केला. यासह युनायटेडने मध्यंतरापूर्वी १-० ने आपला विजय निश्चित केला.

गुरुवारी युनायटेडमोर ‘दादा’
सलामी सामन्यात रोमहर्षक विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या जॉन अब्राहमच्या युनायटेड संघासमोर गुरुवारी दादा सौरव गांगुलीच्या अथॅलेटिको डी कोलकाता संघाचे तगडे आव्हान असेल. उद्घाटनीय सामन्यात मुंबई एफसीला नमवून कोलकाता संघाने लीगमध्ये दमदार सुरुवात केली आहे. आपली विजयी मोहीम अबाधित ठेवण्याचा कोलकाता संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे युनायटेड संघदेखील लीगमध्ये दुसरा विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे.

पुण्यासमोर आज दिल्लीचे आव्हान
हृतिक रोशनच्या पुणे एफसीला इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी दिल्ली डायनामोजच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागले. डेल पियरेच्या उपस्थित घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवण्यासाठी यजमान दिल्ली संघ उत्सुक आहे. दुसरीकडे या मैदानावर प्रथमच खेळ असलेला जुवेंट्सचा डेल पियरे आपल्या जादुई खेळीचे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाला आहे. याशिवाय डेव्हिड ट्रेझेगुटदेखील दिल्लीकडून उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.