चौथ्या इयत्तेतील मुलं-मुली खेळाच्या बाबतीत तेवढे हुशार नसतात. कारण त्यांचे वयही तेवढे नसते. परंतु जादेन न्यूमॅन नावाची अमेरिकेची मुलगी याला अपवाद आहे. ती अगदी व्यावसायिक खेळाडूप्रमाणे बास्केटबॉल खेळते. त्यामुळेच तिला एवढ्या कमी वयामध्येसुध्दा मियामी विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघामध्ये सहभागी करण्यात आले.
यापूर्वीही ती तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूंसोबत खेळली आहे. त्यासोबतच ती ओरलँडो डाउनी ख्रिश्चन शाळेमध्येसुध्दा खेळली आहे.
'मियामी युनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्रशिक्षकांनी माझ्या मुलीचा विद्यापीठीय संघात समावेश केल्याने, मी खूप आनंदी आहे' अशी प्रतिक्रिया जादेच्या वडीलांनी दिली आहे.
युट्यूबवर बनली सेलिब्रेटी
जादेनचा चाहतावर्ग तयार झाला आहे. ती जेव्हा शाळेतील संघामध्ये खेळत होती, त्यावेळीचा तिचा सामना युट्युबर सहा लाख 54 हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे.
(फोटोओळ- बॉस्केटबॉल खेळताना जादेन)
पुढील स्लाइडवर पाहा, जादेनची छायाचित्रे...