आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्‍या अनोळख्‍या गोष्‍टी... ज्‍या तुम्‍हाला माहित नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने कसोटीतून निवृत्त होण्‍याचा घेतलेला निर्णय अपेक्षित असाच होता. परंतु, तो इतक्‍या लवकर घेतला जाईल असे कुणाला वाटलेच नव्‍हते. त्‍याने आताच का हा निर्णय घेतला याबाबतीत प्रत्‍येकांची मतमतांतरे वेगळी असतील. पण या निर्णयामुळे त्‍याच्‍यावर सातत्‍याने टीका करणा-यांच्‍या पोटावर पाय पडणार हे निश्चित. आपल्‍यावर होणा-या टीकेकडे दुर्लक्ष करीत त्‍याने कधीच त्‍याला प्रत्‍युत्तर देण्‍याचा प्रयत्‍न केला नाही. यातच त्‍याचे महानपण दिसून येते. वयाच्‍या अवघ्‍या 16व्‍या वर्षी पदार्पण करणा-या सचिनने आपल्‍या 24 वर्षांच्‍या करिअरमध्‍ये अनेक मैलाचे दगड गाठले. विक्रमांचे इमले बांधले. त्‍याचे काही विक्रम तर असे आहेत, की ते भविष्‍यातही कोणी मोडू शकणार नाही.

क्रिकेटला जंटलमन गेम म्‍हणून ओळखले जाते. सचिनला या 'जंटलमन' खेळाचा ब्रँड अ‍ॅम्‍बेसिडर म्‍हणता येईल. आपला हा देव आता मैदानात खेळताना दिसणार नाही. याचेच सर्वांना दु:ख होतंय. सचिनची फलंदाजी पाहत दोन पिढया घडल्‍या. त्‍याचे विक्रम तोंडपाठ असलेले आपल्‍याला अनेकजण सापडतील. पण आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत सचिनबाबत अशा काही गोष्‍टी जी कधी तुम्‍ही ऐकल्‍या नसतील. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...