आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseen Pictures Of Gorgeous Tanya Perera Who Stumped Asia Cup Hero Lasith Malinga

मलिंगा \'द गेम चेंजर\' : पहिल्‍याच नजरेत इव्‍हेंट मॅनेजरवर जडले होते प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज, आपल्‍या अनोख्‍या शैलीने आणि भन्‍नाट वेगाने भल्‍या - भल्‍या फलंदाजांची धांदल उडवतो. परंतु प्रेमात मात्र 'क्लिन बोल्‍ड' झाला आहे. 2007 मध्‍ये ए‍का जाहिरातीच्‍या चित्रिकरणादरम्‍यान त्‍याचा तानिया मिनोली पेरेरा (मॅनेजर) सोबत ओळख झाली. आणि पहिल्‍याच नजरेत मलिंगा तिच्‍या प्रेमात पडला. श्रीलंकेचा 'गेम चेंजर' म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मलिंगान 2010 मध्‍ये तानियासोबत विवाहबध्‍द झाला.
'यार्कर किंग' या नावाने क्रिकेट जगतात सुपरिचीत असलेला मलिंगा विश्‍वचषक 2015 मध्‍ये सहभागी होत आहे. कदाचीत हा त्‍याच्‍या कारकीर्दीतील शेवटचा विश्‍वचषक असेल. त्‍यानिमित्‍ताने divyamarathi.com आपणस त्‍याच्‍या खासगी आयुष्‍याविषयी काही निवडक गोष्‍टी सांगणार आहे.
अशी झाली होती पहिली भेट
हिक्कदुवा मधील एका हॉटेलमध्‍ये मलिंगा एका जाहिरातीच्‍या चित्रीकरणासठासाठी आला होता. त्‍यावेही इव्‍हेंट मॅनेजरपदी होते. पहिल्‍याच नजरेत आमचे प्रेम जडले होते. असे मलिंगाची पत्‍नी तानियाने आपल्‍या लव्‍ह स्‍टोरीबद्दल सांगितले.
दुस-या भेटीत झाली नंबरची आदान-प्रदान
मलिंगा आणि तानियाची दुसरी भेट गालेतील एका हॉटेलमध्‍ये झाली होती. मलिंगा या शहरातीलच रहिवासी आहे. भेटीदरम्‍यान दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरची आदान-प्रदान केली. आणि प्रेमाची खरी सुरुवात येथूनच सुरु झाली. दोघेही रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत होते.
लग्‍नासाठी प्रेयसीच्‍या वडिलांना पटवले
मलिंगाने तनियासमोर लग्‍नाचा प्रस्‍ताव ठेवला. परंतु तनियाने तिच्‍या वडिलांची परवानगी घ्‍यायला सांगितले. तनियाचे वडिल अमेरिकेमध्‍ये राहत होते. ते मायदेशी परतल्‍यानंतर मलिंगाने त्‍यांच्‍याशी चर्चा केली. आणि आपल्या प्रेमाविषयी आणाभाका घेतल्‍या. चर्चेचे रुपांतर लग्‍नामध्‍ये झाले. 22 जानेवारी 2010 मध्‍ये तनिया आणि मलिंगाचा विवाह झाला. त्‍यांना एक मुलगी आहे.
लसिथ मलिंगाचे क्रिकेट करियर
टेस्ट पदार्पण :
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, डार्विन , 01 जुलै2004
एकदिवसीय पदार्पण : श्रीलंका विरुद्ध युनाइटेड अरब अमिरात, 17 जुलै 2004
विश्‍वचषकामध्‍ये दोन हॅट्रिक
लसिथ मलिंगाने 2007 च्‍या विश्‍वचषकामध्‍ये हॅट्रिक केली. त्‍याने चार चेंडूंवर चार विकेट मिळविल्‍या होत्‍या. दक्षिण आफ्रिकेवर निसटता विजय मिळविला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, तानिया आणि लसिथ मलिंगाची काही निवडक छायाचित्रे...