आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upbeat Chennai Super Kings Take On Wounded Pune Warriors

वॉरियर्ससमोर आज सुपरकिंग्जचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - आयपीएल-6 मध्ये पुणे वॉरियर्ससमोर सोमवारी दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचे तगडे आव्हान असेल. यजमान संघाचा आयपीएलमधील हा चौथा आणि पुणे वॉरियर्सचा पाचवा सामना असेल. सुपरकिंग्जने यापैकी दोन आणि वॉरियर्सने एका सामन्यात विजय मिळवला. आतापर्र्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्यास सुपरकिंग्जने पुणे वॉरियर्सवर आपला दबदबा निर्माण केला आहे. या सामन्यात पुण्याचे वॉरियर्स श्रीलंकन कर्णधार मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत यजमानांच्या आव्हानाला सामोरे जातील. तामिळनाडूमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंना विरोध केला जात आहे. यामुळे आयपीएलच्या आयोजन समितीने या खेळाडूंना बाहेर बसवण्याचा आदेश दिला.

चेन्नईला घरच्या मैदानाचा फायदा
यजमान सुपरकिंग्ज टीममध्ये अनेक मॅचविनर आहेत. त्याच्याकडे हसी आणि मुरली विजयसारखी मजबूत सलामीची जोडी आहे. रवींद्र जडेजा आणि डॅवेन ब्राव्होच्या रूपात दोन ऑलराउंडरदेखील संघात आहेत. धोनी आणि रैनासारखे जबरदस्त फलंदाज चेन्नईचे मजबूत स्थान आहे. अश्विन व नॅनेस हेदेखील गोलंदाजीत माहिर आहेत. याचा घरच्या मैदानावर चेन्नईला फायदा मिळेल.

गोलंदाजी वॉरियर्ससाठी चिंतेचा विषय
फलंदाजी ही पुणे वॉरियर्सची मजबूत बाजू आहे. त्याच्याकडे युवराजसिंग, रॉस टेलर, रॉबिन उथप्पा, मार्लोन सॅम्युअल्ससारखे स्फोटक फलंदाज आहेत. मात्र, गोलंदाजी ही त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्याच्याकडे आश्वासक असा एकही गोलंदाज नाही.