आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upset Not Led Team India For Long Time Sachin Tendulkar

नेतृत्व काढून घेतल्याने निराश होतो , सचिन तेंडुलकरची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - किकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालणा-या सचिन तेंडुलकरलाही एक खंत आहे. दीर्घकाळापर्यंत संघाचे नेतृत्व करू शकलो नसल्याचे शल्य आजही मनात आहे, असे त्याने एका कार्यक्रमात स्पष्ट केले.‘माझ्यासाठी क्रिकेट हे वैयक्तिक नाही, हा एक सांघिक खेळ आहे. यात एक वेळ अशी येते की, नेतृत्व करणारा आपली भूमिका बजावतो. तो मैदानावर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतो.
मात्र, फलंदाजांना धावा काढणे आणि गोलंदाजांना योग्य दिशेने चेंडू टाकावे लागतात. नेतृत्वाच्या पहिल्या कार्यक्रमात १२ ते १३ महिन्यांनंतर माझ्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. कर्णधार म्हणून माझी मोठी कारकीर्द नव्हती. या निराशेतून सावरण्यासाठी मला बराच वेळ लागला,’ असेही सचिन म्हणाला.

सचिनने दोन वेळेस भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्याकडे १९९६ मध्ये कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर १९९७ मध्ये त्याची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. १९९९ मध्ये पुन्हा एकदा सचिनकडे नेतृत्व सोपवण्यात आले. मात्र, वर्षभरानंतर त्याने हे पद सोडून दिले.

सचिन तेंडुलकरने ७३ वनडेत टीम इंडियाचे नेतृत्व केले. यातील २३ सामन्यात संघाला विजय मिळाला आणि ४३ सामन्यात संघ पराभूत झाला. म्हणजेच त्याला ३५ टक्के यश मिळाले. कसोटीत या यशाची टक्केवारी ३६ राहिली.

पुढे वाचा.. संगकारा सचिनचा विक्रम मोडू शकतो