आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Atheletics Championship: Tyson Gay Become Fast Runner

यूएस अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: टायसन गे सर्वात वेगवान धावपटू ठरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोवा - अमेरिकेचा स्टार धावपटू टायसन गेने यूएस अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप जिंकली. त्याने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 19.74 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. इसिह यंगला 19.86 सेकंदांसह दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. कुर्टिस मिचेल (19.99 से.) तिस-या स्थानावर राहिला. अव्वल स्थानासह टायसनने आगामी आयएएएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील स्थान निश्चित केले. ही स्पर्धा 10 ते 18 ऑगस्टदरम्यान म्युनिच येथे होणार आहे.


पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियन डुने सोलोमनने अव्वल स्थान गाठले. त्याने 1:43.27 सेकंदात शर्यत पूर्ण केली. निक सायमंड्सने दुसरे स्थान पटकावले. त्याने 1:43.70 सेकंदात शर्यत पूर्ण करून दुस-या स्थानी धडक मारली. या वेळी ब्रॅडन जॉन्सनने 1:43.97 सेकंदात तिसरे स्थान गाठले.


विक्रमवीर मेरिटचे पुनरागमन
110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतील विश्वविक्रमवीर मेरिटने दमदार पुनरागमन केले. दुखापतीतून सावरलेल्या मेरिटने 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तिसरे स्थान पटकावले. या गटात रेयान विल्सनने 13.08 सेकंदात स्पर्धा आपल्या नावे केली. या वेळी डेव्हिड ओलिव्हरने 13.11 सेकंदांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.