आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी महाविद्यालयात खेळांसाठी गडगंज फी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सकाळी आठ वाजताचा वर्ग सर्वाधिक त्रासदायक असतो. परंतु खेळासाठी नेमके किती पैसे मोजावे लागतात, हे कळल्यावर त्यांचा आणखी तिळपापड होतो. ओहियो विद्यापीठात क्रीडा व्यवस्थापनाचे प्राध्यापक बी डेव्हिड रिडपाथ यांनी ‘मिड-अमेरिकन’ चर्चासत्रात (एमएसी) तब्बल चार हजार विद्यार्थ्यांना एक प्रश्न केला होता. तुमच्याकडून घेतल्या जाणा-या वार्षिक विद्यार्थी फीतील पैसा मोठ्या प्रमाणावर ‘कॉलेजिएट अथलेटिक डिपार्टमेंट’ च्या खर्चासाठी वापरला जातो याची तुम्हाला कल्पना आहे का? उदाहरणादाखल मियामी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून 97,668 रुपये वार्षिक फी आकारली जाते. यातील जवळपास आर्धी म्हणजेच 5,51,667 रुपये अ‍ॅथलेटिक, स्कॉलरशिप, प्रशिक्षकांचे वेतन आणि क्रीडा संबंधित इतर उपक्रमांवर खर्च केला जातो.

जवळजवळ 40 टक्के विद्यार्थ्यांनी याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली की, त्यांची फी खेळांच्या फंडांसाठी खर्च केली जाते. आपण कुठल्याही खेळात सहभागी होत नसूनही आपल्याकडून खेळासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम आकारली जात असल्याचे ऐकून अनेकांना धक्काच बसला. यूएस टुडेनुसार 227 सार्वजनिक संस्थांपैकी केवळ 22 संस्था अशा आहेत की, ज्यांच्या अ‍ॅथलेटिक विभागाकडे खर्च भागवण्यासाठी मुबलक निधी आहे.

उच्चस्तरीय फुटबॉल टीम असणा-या शाळांमध्ये प्रतिअ‍ॅथलेटिक सवलतींचे प्रमाण 2005 ते 2010 दरम्यान 61 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे, या कालावधीत विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षणासंबंधी खर्चात केवळ 23 टक्क्यांची वाढ झाली. कॉलेजचा खर्च कमी करण्याचे आश्वासन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले आहे.