आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएस फॉर्म्युला वन : हॅमिल्टन यूएस ग्रँडप्रिक्सचा विजेता !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्टिन - मर्सिडीझचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने सत्राच्या अखेरीस शानदार कामगिरी करताना यूएस ग्रँडप्रिक्स फॉर्म्युला वन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. या शर्यतीत हॅमिल्टननला त्याच्याच संघाचा निको रोसबर्गकडून जोरदार आव्हान मिळाले. रोसबर्ग दुस-या स्थानी आला. या विजयानंतर आता फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावण्याची हॅमिल्टनला सुवर्णसंधी दिसत आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी हॅमिल्टन रोसबर्गच्या तुलनेत २४ गुणांनी पुढे असून या सत्रातील अखेरच्या दोन शर्यती अद्याप शिल्लक आहेत. ब्राझील आणि अबुधाबी येथील शर्यतीतही तो चांगली कामगिरी करून वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकू शकतो.

लुईस हॅमिल्टननने ५६ फे-या पूर्ण करताना एक तास ४०.४.७८५ सेकंदांत बाजी मारली. या शर्यतीतून हॅमिल्टनला २५ गुण मिळाले. त्याच्याच संघाच्या रोसबर्गने एक तास ४० मिनिटे, ४.३ सेकंदांत दुसरे स्थान मिळवले. रेडबुलचा ड्रायव्हर डॅनियल रिकार्डोने तिसरे, तर विल्यम्स मर्सिडीझच्या फ‍िलीप मासाने चौथे आणि याच संघाच्या वॉल्टरी बोटासने पाचवे स्थान मिळवले. फेरारीच्या फर्नांडो अलांसोने सहावे, रेडबुलच्या सेबेस्टियन वेटेलने सातवे, मॅक्लारेनच्या केविन मॅगुनसेनने आठवे, लोटस रेनॉल्टच्या पी. मालडोनाल्डने नववे आणि एसटीआर रेनॉल्टच्या जीन इरिक वर्गेनने स्पर्धेत दहावे स्थान मिळवले.

अंतिम फेरीत पोल पोझिशन घेऊनही वेटेलला फायदा उचलता आला नाही. तो सातव्या स्थानी आला. मागच्या स्पर्धेप्रमाणे आणि कालच्या सरावानुसार तो लयीत दिसला नाही.

स्पर्धेचा निकाल
१. लुईस हॅमिल्टन, मर्सिडीझ.
२. निको रोसबर्ग, मर्सिडीझ.
३. डॅनियल रिकार्डो, रेडबुल.
४. फ‍िलिप मासा, विल्यम्स.
५. व्ही. बोटास, विल्यम्स.

या विजयाने मी आनंदित आहे. या विजयाचा मला जागतिक चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी फायदा होईल. हे सर्किट चांगले आहे. सुरुवातीला थोडे कठीण गेले. नंतर अडचण वाटली नाही.
- हॅमिल्टन, विजयानंतर.