आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Open: Azarenka , Federra Entered In Semifinal

अमेरिकन ओपन टेनिस: अजारेंका, फेडररची उपांत्य फेरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, स्पेनचा राफेल नदाल आणि बेलारूसची व्हिक्टोरिया अजारेंका यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पध्रेच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सातवा मानांकित फेडररने फ्रान्सच्या आंद्रियन मनारिनोला 6-3, 6-0, 6-2 ने मात दिली. आता पुढच्या फेरीत फेडररचा सामना 19 वा मानांकित स्पेनच्या टॉमी रॉबरेडोशी होईल. नदालने क्रोएशियाच्या इवान डोडिंगला 6-4, 6-3, 6-3 ने पराभूत केले. चौथ्या फेरीत नदालचा सामना र्जमनीच्या फिलिप कोलश्वईबरशी होईल. महिला गटात दुसरी मानांकित अजारेंकाने फ्रान्सच्या एलाइज कॉर्नेटला 6-7, 6-3, 6-2 ने पराभूत करून अंतिम 16 खेळाडूंत प्रवेश केला. आता पुढच्या फेरीत तिचा सामना सर्बियाच्या अँना इवानोविकशी होईल. सर्बियाची खेळाडू 13 वी मानांकित इवानोविकने अमेरिकेच्या क्रिस्टिना मॅक्हाले हिला 4-6, 7-5, 6-4 ने मात दिली.

सानिया, पेस, बोपन्ना जिंकले
सानिया-झेंग जी (चीन) च्या दहाव्या मानांकित जोडीने हंगेरीची कॅटलिन मरोसी आणि मेगन मोल्टन लेवीला 6-3, 7-5 ने हरवले. चौथी मानांकित जोडी लिएंडर पेस आणि चेक गणराज्यचा रादेक स्तेपानेक यांनी बिगर मानांकित जोडी र्जमनीचा डॅनियल ब्रांडस आणि ऑस्ट्रेलियाचा फिलिप ओस्वाल्ड यांना 4-6, 6-3, 6-4 ने पराभूत केले. रोहन आणि त्यांचा फ्रान्सचा जोडीदार एडुअर्ड रोजर व्ॉसलिन यांनी रशियाचा निकोलई देविदेंको आणि मिखाइल एल्गिन या जोडीला 7-6, 7-6 ने हरवले. दिवीज शरण आणि चीन तैयपैचा येन सन लूही जिंकले.