आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • US Open: Nadal, Serena, Vinus Entered Second Round

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा: नदाल, सेरेना, व्हीनस दुसर्‍या फेरीत दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीतील दुसर्‍या क्रमांकाचा स्पेनच्या राफेल नदालने वाइल्ड कार्डधारक अमेरिकेच्या रेयान हॅरिसनला सरळ सेटमध्ये सहज पराभूत करून अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. बारा वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता नदालने एकही सर्व्हिस गेम न गमावता 97 वा मानांकित हॅरिसनला 6-4, 6-2, 6-2 ने मात दिली.

जबरदस्त फॉर्मात असलेल्या नदालने पहिल्या सर्वमध्ये 72 टक्के, तर दुसर्‍या सर्वमध्ये 71 टक्के गुण मिळवले. वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅमच्या पहिल्या फेरीतील इतर सामन्यांत चौथा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने ऑस्ट्रेलियाच्या नीक काईगियोसला 7-5, 6-3, 6-2 ने हरवले.

आठवा मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटने अमेरिकेच्या मायकेल रसेलला 6-3, 6-4, 6-2 ने तर 19 वा मानांकित स्पेनच्या टॉमी रॉबरेडोने ऑस्ट्रेलियाच्या मारिंको मतोसेविकला संघर्षमय लढतीत 6-3, 7-6, 6-3, 6-2 ने मात देत पुढच्या फेरीत प्रवेश केला. आणखी एका सामन्यात मागच्या वर्षी अँडी रॉडिककडून पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या बनार्ड टॉमिकने तीन तास 56 मिनिटे चाललेल्या स्पेनच्या अल्बर्ट रामोसला 6-3, 3-6, 4-6, 7-6, 6-3 ने हरवले.

सेरेना पुढच्या फेरीत
जागतिक क्रमवारीतील नंबर वनची खेळाडू आणि अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत इटलीच्या फ्रान्सिस्का शियावोनला 6-0, 6-1 ने मात दिली. सेरेनाशिवाय तिची मोठी बहीण आणि माजी नंबर वन खेळाडू व्हीनस विल्यम्सनेसुद्धा आपल्या अनुभवाचा लाभ उचलताना दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. गेल्या प्रदीर्घ काळापासून सुमार फॉर्माशी संघर्ष करीत असल्यामुळे जागतिक क्रमवारीत 60 व्या क्रमांकावर घसरलेल्या व्हिनसने 12 वी मानांकित बेल्जियमच्या कस्र्टन फ्लिपकेन्सला सरळ सेटमध्ये 6-1, 6-2 ने पराभूत केले.

यूएस ओपननंतर जेम्स ब्लॅकची निवृत्ती
अमेरिकेचा अनुभवी खेळाडू जेम्स ब्लॅकने वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पध्रेनंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आणखी पुढे खेळू शकतो. मात्र, या खेळातून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे 33 वर्षीय खेळाडूने नमूद केले.


ब्लॅक म्हणाला, ‘ही माझी अखेरची स्पर्धा आहे. मी शानदार वष्रे या खेळासाठी दिली. टेनिससाठी खर्च केलेल्या प्रत्येक क्षणावर माझे प्रेम आहे. मी यापेक्षा अधिक काय अपेक्षा करू शकतो. मी खूप आनंदी आणि समाधानी आहे. मी स्वत:च्या अटीवर निवृत्त व्हायचे होते. काही वर्षांपूर्वी माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्या वेळी माझी कारकीर्द संपली असती तर खूप वाईट घडले असते. दोन आठवड्यांपूर्वी मी टॉप 20 च्या खेळाडूला हरवले. मी अजूनही फिट आहे. मात्र, निवृत्तीची हीच वेळ आहे,’ असेही त्याने नमूद केले.