आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस: नोवाक योकोविक, अँडी मरे, सेरेना विल्यम्सची विजयी लय कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - गतचॅम्पियन सेरेना विल्यम्स आणि अँडी मरे यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पध्रेतील विजयी लय कायम ठेवली आहे. सेरेनाने वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मरेनेसुद्धा अंतिम 16 खेळाडूंत स्थान मिळवले आहे. अव्वल मानांकित नोवाक योकोविकनेसुद्धा तिसर्‍या फेरीचा सामना जिंकून आगेकूच केली.

अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत आपल्याच देशाच्या स्लोएन स्टीफन्सला 6-4, 6-1 ने पराभूत केले. यासह नंबर वन सेरेनाने स्टीफन्सकडून ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला. चीनच्या ली नाने सर्बियाच्या जेलेना जांकोविचला 6-3, 6-0 ने हरवले. उपांत्यपूर्व फेरीत सेरेनाचा सामना कार्ला सुआरेज नवारो आणि ली नाचा सामना एकतेरिना माकारोवाशी होईल.

सानिया, पेसची आगेकूच, बोपन्नाचा पराभव
भारताचा रोहन बोपन्ना आणि फ्रान्सचा एडवर्ड रोजर व्ॉसलीन या जोडीला पुरुष दुहेरीच्या तिसर्‍या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. कॉलिन फ्लेमिंग-जोनाथन मरे या ब्रिटिश जोडीने बोपन्ना-व्ॉसलिन यांना 6-4, 6-4 ने हरवले. तत्पूर्वी लिएंडर पेस आणि रादेक स्तेपानेक (चेक गणराज्य) यांनी मायकेल लोड्रा आणि निकोलस महूत या फ्रान्सच्या जोडीला 7-5, 4-6, 6-3 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि चीनच्या जी झेंग यांनीसुद्धा अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला. सानिया अणि झेंग यांनी एना लीना ग्रोएनफील्ड आणि क्वेता शेंक या र्जमनीच्या जोडीला 6-2, 6-3 ने पराभूत केले. लिएंडर पेस आणि सानिया मिर्झाकडूनच आता भारताला आशा आहे. महेश भूपती यापूर्वीच स्पध्रेबाहेर झाला असून आता बोपन्नाही हरला आहे.


हा सामना कठीण
‘हा सामना माझ्यासाठी कठीण होता. जे खेळाडू तुम्हाला आवडतात आणि ज्यांना जिंकताना पाहणे तुम्हाला आवडते अशा खेळाडूंविरुद्ध सामना अवघड असतो.’ - सेरेना विल्यम्स, अमेरिका.


मरे, फेडररचा सहज विजय
ब्रिटिश स्टार अँडी मरेने र्जमनीचा खेळाडू फ्लोरियन मेयरला 7-6, 6-2, 6-2 ने पराभूत करून पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. सर्बियाच्या योकोविकने पोतरुगालचा जोओ सोसो याला 6-0, 6-2, 6-2 ने मात दिली. ऑस्ट्रेलियाचा लियोटन हेविट, रशियाचा मिखाइल योज्नी, चेक गणराज्यचा थॉमस बर्डिच, स्वित्झर्लंडचा स्टानिसलास वावरिंका, स्पेनचा मार्सेल ग्रेनोलर्स, उझबेकिस्तानचा डेनिस इस्तोमिन यांनीसुद्धा प्री क्वार्टरमध्ये प्रवेश केला.


पोलंडच्या रंदावास्काचा धक्कादायक पराभव
तिसरी मानांकित एग्जिस्का रंदावास्का आणि आठवी मानांकित अँजोलिक कर्बर यांचा धक्कादायक पराभव झाला. 24 वी मानांकित रशियाच्या माकारोवाने पोलंडाच्या रंदावास्काला 6-4, 6-4 ने हरवले. दुसरीकडे 18 वी मानांकित स्पेनच्या कार्ला सुआरेजने र्जमनीच्या कर्बरला 4-6, 6-3, 7-6 ने मात दिली. ली नाने या स्पध्रेतही शानदार कामगिरी करताना आगेकूच केली. करिअरमधील दुसर्‍या ग्रँडस्लॅमसाठी ती सज्ज आहे.