आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US ओपन: फेडरर अंतिम आठमध्ये, महिला गटात सारा इराणीचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - दुसरा मानांकति स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. महिला गटात दहावी मानांकित कॅरोलीन वोज्नियाकीने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

१७ वेळेसचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन आणि दुसरा मानांकति फेडररने पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत १७ वा मानांकति स्पेनच्या रॉबटोर बोटिस्टाला सरळ सेटमध्ये ६-४, ६-३, ६-२ ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यासह ३३ वर्षीय फेडररने ऑर्थर अॅश स्टेडियमवर आपला विजय-पराभवाचा रेकॉर्ड २५-१ असा केला. पहिल्यांदा फेडररचा सामना करीत असलेला बोटिस्टा पहिल्या सेटमध्ये ५-१ ने मागे पडला होता. फेडररने दोन तासांत सरळ सेटमध्ये सामना जिंकला. मागच्या ११ वर्षांत दहाव्यांदा त्याने या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशाचा पराक्रम केला.

दुसरीकडे महिला गटात डेन्मार्कच्या वोज्नियाकीने आपले विजयी अभियान कायम ठेवताना १३ वी मानांकति इटलीच्या सारा इराणीला स्पर्धेबाहेर केले. वोज्नियाकीने उपांत्यपूर्व सामन्यात इराणीला ६-०, ६-१ अशा एकतर्फी लढतीत पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. वोज्नियाकीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना सामन्यावर आपली पकड ठेवली.

शुआई सेमीफायनलमध्ये
चीनच्या पेंग शुआईने १७ वर्षीय स्वित्झर्लंडच्या बी. बेनिसिसला सहजपणे ६-२, ६-१ ने पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. दुहेरीतील तरबेज असलेली २८ वर्षीय शुआईने २०१३ ची ज्युनियर नंबर खेळाडू बेनसिसला अवघ्या ६४ मिनिटांत स्पर्धेबाहेर केले.

टॉमस बर्डिच क्वार्टर फायनलमध्ये
पुरुषांत सहावा मानांकति टॉमस बर्डिचने २० वर्षीय ऑस्ट्रियाचा खेळाडू डॉमनिकि थिएमला ६-१, ६-२, ६-४ ने पराभूत करून चाैथ्या फेरीचा सामना जिंकला. २० वा मानांकति फ्रान्सच्या गाएल मोन्फिल्सने २३ वर्षीय सातवा मानांकति बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमति्रोवला ७-५, ७-६ ,७-५ ने मात दिली. १४ वा मानांकति क्रोएशियाच्या मारीन सिलिचने २६ वा मानांकति फ्रान्सच्या जाइल्स सिमोनला ५-७, ७-६, ६-४, ३-६, ६-३ ने मात दिली. सिलिचने दमदार पुनरागमन करून विजय मिळवला.

छायाचित्र - परतीचा फटका मारताना रॉजर फेडरर आणि इन्सेट वोज्नियाकी.

पुढील स्लाइडमध्ये, सानिया-कारा सेमीफायनलमध्ये