आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएस ओपन: सेरेना विल्यम्सचा एकतर्फी लढतीत विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेची सेरेना विल्यम्सने एकतर्फी लढतीत विजय मिळवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष गटात अव्वल मानांकित नोवाक योकोविक आणि गत चॅम्पियन इंग्लंडच्या अँडी मरेने उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली.


विशेष म्हणजे महिला आणि पुरुष गटात जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना आणि योकोविक यांनी स्पॅनिश खेळाडूविरुद्ध विजय मिळवला. अव्वल मानांकित सेरेनाने 18 वी मानांकित स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोला एकतर्फी उपांत्यपूर्व फेरीत 6-0, 6-0 ने पराभूत केले. योकोविकने चौथ्या फेरीत स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्सला सरळ सेटमध्ये 6-3, 6-0, 6-0 ने हरवले. इतर एका लढतीत इंग्लंडच्या अँडी मरेने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनला 6-7, 6-1, 6-4, 6-4 अशा संघर्षपूर्ण लढतीत मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.


ली ना- सेरेनात होणार सामना
महिला गटात पाचवी मानांकित ली ना अमेरिकेन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली चीनची खेळाडू ठरली आहे. 31 वर्षीय ली नाने रशियाच्या एकातेरिना माकारोवाला 6-4, 6-7, 6-2 ने संघर्षमय लढतीत हरवले. आता उपांत्य सामन्यात ली नाचा सामना अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सशी होईल. महिलांच्या इतर एका हायप्रोफाइल सामन्यात जागतिक क्रमवारीतील दुस-या क्रमांकाची खेळाडू बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने 13 वी मानांकित सर्बियाच्या अ‍ॅना इवानोविकला 4-6, 6-3, 6-4 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.


युजनी अंतिम आठमध्ये
पुरुष गटातील नंबर वन खेळाडू योकोविकला उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या मिखाइल योजनीशी लढायचे आहे. स्पर्धेतील 21 वा मानांकित योजनीने ऑस्ट्रेलियाच्या लियोटन हेविटला चार तास रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत 6-3, 3-6, 6-7, 7-5 ने नमवले.


लिएंडर पेस-स्तेपानेक सेमीफायनलमध्ये
भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू लिएंडर पेस आणि चेक गणराज्यच्या रादेक स्तेपानेक या जोडीने रोमांचक सामन्यानंतर यूएस ओपन पुरुष दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. चौथी मानांकित भारत-चेक खेळाडूंच्या जोडीने पाकिस्तानचा एसाम उल हक कुरेशी आणि हॉलंडचा जीन ज्युलियन रॉजरच्या पाचव्या मानांकित जोडीला अडीच तास रंगलेल्या सामन्यात 6-1, 6-7, 6-4 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.


फेडररला ब्रेकची गरज : नोवाक योकोविक
जागतिक क्रमवारीतील नंबर वन नोवाक योकोविक सध्या सुमार फॉॅर्माशी संघर्ष करीत असलेला स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररच्या मदतीला धावला आहे. फेडररला सध्या ब्रेकची गरज आहे, असे मत योकोविकने व्यक्त केले. 17 वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता फेडरर मागच्या काही महिन्यांपासून सुमार फॉर्माशी संघर्ष करीत आहे. मात्र, योकोविकने फेडररचे समर्थन केले. ‘कोणत्याही खेळाडूसाठी ही सामान्य गोष्ट आहे, असे मला वाटते. फॉर्म हरवणे, हे नवीन नाही. प्रत्येक खेळाडूसोबत असे होत असते. माझ्या मते, फेडरर अजूनही उच्च् दर्जाचा खेळ करीत आहे. तो अजूनही जगातल्या टॉप-5 खेळाडूंत सामील होण्याचा हक्कदार आहे,’ असे तो म्हणाला.