आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन ओपन टेनिस: मरे, सोमदेवची आगेकूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - भारताचा पात्रता फेरीतील खेळाडू सोमदेव देववर्मन आणि गत चॅम्पियन इंग्लंडच्या अँडी मरेने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसºया फेरीत प्रवेश केला आहे. 28 वर्षीय सोमदेवने पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या लुकास लाकोला पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन सामन्यात 4-6, 6-1, 6-2, 4-6, 6-4 ने पराभूत केले. तिसरा मानांकित मरेने फ्रान्सच्या मायकेल लोड्राला 6-2, 6-4, 6-3 ने हरवले. महिला गटात व्हीनस विल्यम्सला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
सोमदेव आणि लाकोचा सामना तीन तास आणि 11 मिनिटे रंगला. मात्र, सोमदेवला तिसरा सेट जिंकल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे चार तास वाट बघावी लागली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडू प्रत्येकी 4-4 ने बरोबरीत होते. मात्र, सोमदेवने त्याची सर्व्हिस ब्रेक करताना सामना आपल्या नावे केला. आता दुसºया फेरीत सोमदेवचा सामना 20 वा मानांकित आंद्रियस सेप्पीशी होईल.
इतर एका महत्त्वपूर्ण सामन्यात अमेरिकेच्या जेम्स ब्लॅकला आपली अखेरची स्पर्धा संस्मरणीय करता आली नाही. अमेरिकन ओपन स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ब्लॅकने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, त्याचा पहिल्याचा फेरीत पराभव झाला. ब्लॅकला पहिल्या फेरीत क्रोएशियाच्या इवा कार्लोविकने 6-7, 3-6, 6-4, 7-6, 7-6 अशी मात दिली. दोन माजी चॅम्पियन जुआन मार्टिन डेल पोत्रो आणि आॅस्ट्रेलियाच्या लियोटन हेविट यांनी शानदार खेळ करून दुसºया फेरीत प्रवेश केला. 2009 चा विजेता सहावा मानांकित पोत्रोने स्पेनच्या गुलेर्मो गार्सिया लोपेजला 6-3, 6-7, 6-4, 7-6 ने तर 2011 चा यूएस ओपन चॅम्पियन हेविटने ब्रायन बेकरला 6-3, 4-6, 6-3, 6-4 ने मात दिली.
झेंगकडून व्हीनसचा धक्कादायक पराभव
माजी नंबर वन खेळाडू आणि दोन वेळेसची चॅम्पियन अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सला महिला गटात चीनच्या झेंग जीकडून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. व्हीनसने पहिल्या फेरीत विजयी सुरुवात केली होती. मात्र, दुसºया फेरीत तिला झेंगने 6-3, 2-6, 7-6 ने हरवले. तिसरी मानांकित पोलंडच्या एग्निजस्का रंदावास्काने विजयी अभियान कायम ठेवताना तिसºया फेरीत प्रवेश केला. तिने स्पेनच्या मारिया टेरेसा टोरो फ्लोरला 6-0, 7-5 ने मात दिली. इतर एका सामन्यात पाचवी मानांकित चीनच्या ली नाने स्वीडनच्या सोफिया एरविडसनला 6-2, 6-2 ने पराभूत केले.
इतर महत्त्वाचे निकाल
पुरुष गट
० अ‍ॅँडी मरे वि. वि. मायकेल लोड्रा (6-2, 6-4, 6-3)
० सोमदेव देववर्मन वि. वि. लाको (4-6, 6-1, 6-2, 4-6, 6-4)
० वावरिंका वि.वि. स्तेपानेक (7-6, 6-3, 6-2)
० बगाडिस वि. वि. सोएडा (6-4, 6-3, 6-1)
० लियोटन हेविट वि. वि. बेकर (6-7, 3-6, 6-4, 7-6, 7-6)
० डेल पेत्रो वि. वि. जी. लोपेझ (6-3, 6-7, 6-4, 7-6)
० योज्नी वि. वि. माहूत (6-4, 6-4, 7-6)
० मेयर वि. वि. हानेस्कू (7-6, 2-6, 6-4, 6-1)
महिला गट
० स्टीफन्स वि. वि. यू. रंदावास्का
(6-1, 6-1)
० झेंग वि. वि. व्हीनस विल्यम
(6-3, 2-6, 7-6),
० रंदावास्का वि. वि. टोरो
(6-0, 7-5),
०ली ना वि. वि. अर्विडसन (6-2, 6-2) ०रॉबसन वि. वि. गार्शिया (6-4, 7-6)