आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Open Tenis: Novick Yokovich Entered Semifinal Round

अमेरिकन ओपन टेनिस: नोवाक योकोविकची उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - गतविजेत्या अँडी मरेच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील विजयी मोहिमेला उपांत्यपूर्व फेरीत ब्रेक लागला. या लढतीतील पराभवामुळे त्याचे किताबावरचे वर्चस्व राखून ठेवण्याचे स्वप्न भंगले. दुसरीकडे जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक योकोविकने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.


ऑर्थर ऐश स्टेडियममध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण लढतीदरम्यान वेगवान वा-याचा अडथळा पार करून योकोविकने अंतिम चारमध्ये प्रवेश केला. त्याने रशियाच्या मिखाईल युजनीला पराभूत केले. सर्बियाच्या खेळाडूने 6-3, 6-2, 3-6, 6-0 ने सामना जिंकला. यासाठी त्याला तब्बल 2 तास 34 मिनिटे शर्थीची झुंज द्यावी लागली. 21 व्या मानांकित मिखाईलने तिस-या सेटमध्ये दमदार पुनरागमन करताना बाजी मारली. मात्र, चौथ्या सेटमध्ये त्याचा योकोविकसमोर फार काळ निभाव लागला नाही. अवघ्या 29 मिनिटांत जगातील नंबर वन खेळाडूने चौथा सेट 6-0 ने जिंकला. त्याने सामन्यात 32 विनर्स मारले.


योकोविकचा सामना आता वावरिंकाशी होईल. यंदाच्या सत्रातील ऑस्ट्रेलियन ओपननंतर प्रथमच हे दोघे समोेरासमोर येणार आहेत. यापूर्वी योकोविकने वावरिंकाविरुद्धचा सामना जिंकला होता.


सेरेना-व्हीनसची आगेकूच
अमेरिकेच्या सेरेना आणि व्हीनसने महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. या जोडीने उपांत्यपूर्व लढतीत सारा इराणी व रॉबर्टा विन्सीचा 6-3, 6-1 ने पराभव केला


सानिया-झेंगचा दुहेरीत पराभव
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या एश्ले बार्टी व कासे डेल्लाका या आठव्या मानांकित जोडीने सानिया-झेंगला सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-2 अशा फरकाने पराभूत केले. या जोडीने अवघ्या 65 मिनिटांत सामना जिंकला.


वावरिंकाकडून अँडी मरे पराभूत
विम्बल्डन चॅम्पियन मरेला उपांत्यपूर्व फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला नवव्या मानांकित स्टानिसलास वावरिंकाने पराभूत केले. स्विसच्या खेळाडूने 6-4, 6-3, 6-2 ने सामना जिंकला. त्याने 2 तास 15 मिनिटांत लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन मरेला हरवले.