आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • US Open Tenis: Yokovick, Federre Entered In Second Round

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन ओपन टेनिस: योकोविक, फेडरर दुस-या फेरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीतील नंबर वन सर्बियाचा नोवाक योकोविक आणि सातवा मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सुरुवात करताना आपापल्या लढती जिंकल्या.


अव्वल मानांकित योकोविकने लिथुआनियाच्या रिकॉडर्स बेरांकिसला पहिल्या फेरीत सरळ सेटमध्ये 6-1, 6-2, 6-2 ने मात दिली. माजी नंबर वन फेडररने स्लोवेनियाच्या ग्रेगा जेज्माला 6-3, 6-2, 7-5 ने हरवले. योकोविकने सामन्यात फक्त दोन चुका केल्या. त्याने तब्बल 10 एस मारले. जागतिक क्रमवारीत 112 व्या क्रमांकावर असलेल्या बेरांकिसविरुद्ध त्याने आठपैकी सात ब्रेक पॉंइंट मिळवले. 26 वर्षीय योकोविकचा पुढच्या फेरीत जर्मनीच्या बेंजामिन बेकरशी सामना होईल. त्याने चेक गणराज्यच्या लुकास रोसोल याला 6-3, 3-6, 6-3, 6-4 ने हरवले.


याशिवाय पाच वेळेसचा यूएस ओपन चॅम्पियन फेडररने 62 वा मानांकित खेळाडू ग्रेगा जेज्माविरुद्ध सामन्यावर नियंत्रण ठेवले. फेडररने 93 मिनिटे चाललेल्या लढतीत 35 विनर मारले. आता दुस-या फेरीत फेडररचा सामना अर्जेंटिनाच्या कार्लोस बेर्लोक याच्याशी होईल. त्याने कोलंबियाच्या सांतियागो गिरॉल्डोविरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत 6-3, 3-6, 6-7, 6-4, 6-2 ने मात दिली.


चेक गणराज्यच्या थॉमस बर्डिचने इटलीच्या पाओलो लोरेंजीला 6-1, 6-4, 6-1 ने हरवले, तर जर्मनीच्या टॉमी हॅसने फ्रान्सचा पॉल हेन्री मॅथ्यूला सरळ सेटमध्ये 6-4, 6-4, 6-1 ने स्पर्धेबाहेर केले.


अजारेंका दुस-या फेरीत, स्टोसूर हरली
जागतिक क्रमवारीतील दुस-या क्रमांकाची महिला खेळाडू बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने यूएस ओपनच्या पहिल्या फेरीत एकतर्फी लढतीत विजय मिळवत दुस-या फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीतील इतर एका सामन्यात गत चॅम्पियन समंथा स्टोसूरला 17 वर्षीय खेळाडूकडून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
० दुसरी मानांकित अजारेंकाने एकतर्फी लढतीत जर्मनीच्या दिनाह फिजेनमियरला सरळ सेटमध्ये 6-0, 6-0 ने गारद केले. अजारेंकाने सहजपणे हा सामना जिंकला. गत चॅम्पियन आणि 11 वी मानांकित ऑस्ट्रेलियाची खेळाडू स्टोसूरला अमेरिकेची युवा खेळाडू व्हिक्टोरिया डुबलने 7-5, 4-6, 4-6 ने मात देत दुस-या फेरीत जागा मिळवली. आता डुबलचा सामना स्लोवाकियाच्या डॅनियला हंचुकोवाशी होईल. हंचुकोवाने मारिया सांचेजला 7-5, 6-2 ने मात दिली.
० इतर लढतीत सर्बियाच्या अ‍ॅना इवानोविकने जॉर्जियाच्या अ‍ॅना तातिशविलीला सहजपणे 6-2, 6-0 ने हरवले. दुस-या सामन्यात सातवी मानांकित चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोवाने जपानच्या मिसाकी डोईला 6-2, 3-6, 6-1 ने हरवले.