आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Open Tennis:Nadal, Azharenka Entered In Semifinal

अमेरिकन ओपन टेनिसमध्‍ये नदाल, अजारेंका उपांत्य फेरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीतील नंबर दोनचा खेळाडू स्पेनचा राफेल नदाल, महिला गटात दुसरी मानांकित बेलारुसची व्हिक्टोरिया अजारेंका यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. महिला गटात इटलीची फ्लाविया पेनेटाने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळवण्याचा
पराक्रम केला.


सध्या भन्नाट फॉर्मात असलेल्या नदालने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 19 वा मानांकित टॉमी रॉबरेडोला सरळ सेटमध्ये 6-0, 6-2, 6-2 ने हरवले. आता सेमीफायनलमध्ये नदालचा सामना आठवा मानांकित फ्रान्सचा खेळाडू रिचर्ड गास्केटशी होईल. गास्केटने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या खेळाडू डेव्हिड फेररचे आव्हान मोडले. गास्केटने फेररला 6-3, 6-1, 4-6, 6-3 ने हरवत पुढची फेरी गाठली. फेररचा पराभव अनपेक्षीत ठरला.


सानिया-जी झेंग
महिला दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये
भारताची सानिया मिर्झा आणि चीनच्या जी झेंग यांनी आपले विजयी अभियान कायम ठेवले आहे. या दोघींनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दहावी मानांकित सानिया-झेंग जोडीने आपल्यापेक्षा अधिक चौथ्या मानांकित चीन-तैपेईची सू वी सी आणि चीनची शुआई पेंग या जोडीला एक तास आणि 50 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 6-4, 7-6 ने मात दिली. आता सेमीफायनलमध्ये सानिया-झेंगचा सामना आठवी मानाांकित ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी आणि कॅसी डेलाक्युआ या जोडीशी होईल. या ऑस्ट्रेलियाच्या जोडीने एकातेरीना माकारोवा आणि एलिना वेस्निना या दुस-या मानांकित रशियन जोडीला 6-2, 6-3 ने पराभूत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यूएस ओपनमध्ये सानिया मिर्झा पहिल्यांदा सेमीफायनलपर्यंत पोहोचली आहे. सानियाने आतापर्यंत चारही ग्रँडस्लॅममध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे. महिला दुहेरीच्या इतर एका सामन्यात पाचवी मानांकित चेक गणराज्यची आंद्रिया लावाकोवा आणि लुसी राडेका या जोडीने तिसरी मानांकित रशियाची नादिया पेत्रोवा आणि स्लोवेनियाच्या कॅटरिना श्रेबोटनिक या जोडीला 4-6, 6-4, 7-5 ने मात दिली.