आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पीड स्टार बोल्टची पुन्हा विश्वविक्रमी धाव !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉर्सा - जगातीलसर्वात वेगवान धावपटू युसेन बोल्टने पुन्हा एका नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. जमैकाच्या या धावपटूने शनिवारी १०० मीटरची इनडोअर शर्यत अवघ्या ९.९८ सेकंदांत पूर्ण केली. याशिवाय त्याने विश्वविक्रम केला. यापूर्वी १०.०५ सेकंदांचा विश्वविक्रम नामिबियाच्या फ्रॅकी फ्रेडरिक्सच्या नावे होता. त्याने १९९६ मध्ये हा विक्रम केला होता. जमैकाच्या बोल्टने शनिवारी नॅशनल स्टेडियममध्ये अ‍ॅन्युअल मेमोरियल स्पर्धेत ही विक्रमी कामगिरी केली.
‘ही शर्यत १० सेकंदांत पूर्ण केली नाही तर मला फार राग येईल,’ असेच बोल्टने रेसपूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. त्याने निश्चित वेळेतच अंतर पूर्ण केले. याशिवाय त्याने नवा विक्रमही आपल्या नावे केला. जमैकाच्या शेल्डन मिशेलने (१०.३३) दुसरे आणि अमेरिकेच्या ट्रेल किमोन्सने (१०.३४) तिसरे स्थान पटकावले. ‘मी यंदाच्या सत्रात कोणत्याही दुखापतीशिवाय स्पर्धेत खेळू इच्छित आहे. कारण मागील काही वर्षांपासून मी बरेच काही सहन केले आहे. झुरिचमध्ये मी सर्वाधिक वेगाने स्पर्धा जिंकेन अशी आशा आहे,’ असेही बोल्ट म्हणाला.
कॅमिलाच्यास्मरणार्थ स्टेडियम : पोलंडनेनॅशनल स्टेडियम हातोडाफेकपटू कॅमिलो स्कोलिमोस्काच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार केले आहे
१०० विक्रमी यश
मीटरचेअंतर
९.९८
सेकंदांतपूर्ण (विक्रमी)
१०.०५
सेकंदांचाफ्रॅकीचा विक्रम ब्रेक
१०० मी. शर्यत ९.५८ से. सुवर्णपदक
२०० मी.शर्यत १९.१९ से. सुवर्णपदक
x ४०० मी. रिले ३६.८४ से. सुवर्ण (बोल्ट, ब्लॅक, फ्रेटर, कार्टर)
हे आहेत बोल्टच्या नावे विक्रम (आऊटडोअर)
१०० मीटर इनडोअरमध्ये सुवर्ण; नामिबियाच्या फ्रॅकी फ्रेडरिक्सचा १०.५ सेकंदांचा विक्रम काढला मोडीत