(भारत दौऱ्यावर एका मैत्रीपूर्ण लढतीमध्ये क्रिकेट खेळताना युसेन बोल्ट)
बंगळूरू - चित्याच्या वेगाप्रमाणे धावणारा महान धावपटू युसेन बोल्टने 'पुमा' च्या एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान झालेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट लढतीमध्ये पाच षटकार ठोकले. त्याने प्रतिस्पर्धी युवराजसिंह च्या संघाला पराभूत केले. त्यानंतर झालेल्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये मात्र तो युवराजसोबत पराभूत झाला. त्याने मुद्दामहून युवराजला पराभूत केले नाही.
युवराजच्या गोलंदाजीवर खेचले उत्तुंग षटकार
बोल्टने सामन्यादरम्याने 19 चेंडूंचा सामना करताना 45 धावा केल्या. त्यामध्ये पाच षटकारांचा समावेश होता. तर युवराजसिंहच्या गोलंदाजीवर त्याने तीन उत्तुंग षटकार खेचले. टीम बोल्टने अखेरच्या चेंडूवर युवराजवर विजय मिळवला. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा होता. सहा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बोल्टने 19 चेंडूंत 45 धावा काढल्या. यात त्याने 5 षटकार ठोकले. यातील 3 षटकार युवीच्या गोलंदाजीवर मारले. त्याच्या संघाने 59 धावांचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर गाठून रोमांचक विजय मिळवला.
तत्पूर्वी, टीम युवराजने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांत 58 धावा काढल्या. युवराज आणि तारे यांनी अनुक्रमे 11 चेंडूंत 24 आणि 11 चेंडूंत 30 धावा काढल्या. युवीने 4 चौकार आणि 1 षटकार, तर तारेने 4 चौकार आणि 1 षटकार मारला.
या सामन्याला "बोल्ट अँड युवी बॅटल ऑफ द लिजेंड्स' असे नाव देण्यात आले होते. यादरम्यान बोल्ट आणि युवीने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीतही सहभाग घेतला. फिनिश लाइनजवळ थांबून बोल्टने युवीला ही शर्यत जिंकू दिली.
9.58 नंबरचा टी शर्ट
बोल्टने 9.58 नंबरचा टी शर्ट परिधान केला होता. 100 मीटर धावण्यामध्ये 9.58 सेकंदात शर्यत पुर्ण करण्याचा त्याच्या नावावर विक्रम आहे.
माझाही विक्रम कोणी मोडणार नाही
'विक्रम साकारले जातात आणि मोडलेही जातात, असे एक धावपटू म्हणून मला वाटते. माझा विक्रम मोडण्यासाठी मात्र त्यासाठी खूप मेहनत आवश्यक आहे. मी तितके परिश्रम घेतले. म्हणून माझा रेकॉर्ड अद्याप अबाधित आहे,’
पुढील स्लाइडवर पाहा, युवराजच्या गोलंदाजीवर षटाकार खेचताना बोल्ट आणि अन्य छायाचित्रे..