आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Usain Bolt Sings In The Rain To Reclaim Sprint Title

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लासगो कॉमनवेल्थ पुढचे लक्ष्य : बोल्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - विश्व चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर शर्यतीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करणारा जमैकाचा धावपटू युसेन बोल्टचे पुढचे लक्ष्य आता ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत पदक जिंकण्याचे आहे. 9.77 सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकल्यानंतर बोल्ट म्हणाला, ‘मी राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत कधीही सहभागी होऊ शकलेलो नाही. मात्र, पुढच्या वर्षी ग्लासगो येथे होणार्‍या स्पध्रेत सहभागी होण्याचे मी आटोकाट प्रयत्न करेन. मी त्या स्पध्रेचा विचार करीत आहे.’ ऑलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपशिवाय इतर स्पर्धांबाबत विचारले असता बोल्ट म्हणाला, ‘मी स्कॉटलंडला जाण्यासाठी आतुर आहे. मी त्या स्पध्रेसाठी तयारी करेन. माझे लक्ष पुढच्या वर्षी ग्लासगो येथे होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेवर आहे.’

भारताचा विकास गौडा सोमवारी जागतिक अँथलेटिक चॅम्पियनशिपमधील थाळीफेकच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेतील थाळीफेक प्रकारात तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.