बंगळुरू - जगातला सर्वाधिक वेगवान धावपटू जमैकाचा युसेन बोल्ट मंगळवारी भारतीय प्रेक्षकांसमोर क्रिकेट खेळणार आहे. बोल्ट मंगळवारी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय स्टार युवराजसिंग आणि जहीर खानसारख्या दिग्गजांसोबत एका मैत्रीपूर्ण सामन्यात खेळणार आहे.
टीम कॉम्बिनेशन
वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बोल्ट सात खेळाडूंच्या संघाकडून खेळेल. या सामन्यात युवराजसिंगसमवेत देशातील आघाडीचे खेळाडू खेळतील. बोल्टच्या संघात त्याचा जिवलग मित्र नुगे वॉकर ज्युनियर, भारताचा महान ऑफस्पिनर हरभजनसिंग यांचा समावेश आहे. युवराजच्या संघात त्याचा मित्र जहीर खानचा समावेश आहे.
नियमांत बदल
हा चार षटकांचा सेव्हन-अ-साइड सामना असेल. या कार्यक्रमाचे आयोजन एका कंपनीकडून करण्यात आले असून माजी क्रिकेटपटू अजय जडेजाच्या देखरेखीखाली हा सामना होईल. दोन्ही संघात एका तज्ज्ञ यष्टिरक्षकाचा समावेश आहे.
वकार युनिसचा आहे चाहता
उसेन बोल्ट पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वकार युनिसचा चाहता आहे. युनिसला पाहूनच त्याला क्रिकेट खेळायची आवड निर्माण झाली होती. तो स्वता वेगवान गोलंदाज बनू इच्छित होता परंतु त्याला एक अॅथलेटपटू व्हावे लागले.
पुढील स्लाइडवर पाहा, उसेन बोल्टची निवडक छायाचित्रे