आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रोम - जमैकाच्या वर्ल्ड चॅम्पियन युसेन बोल्टने शुक्रवारी 100 मीटरची शर्यत 9.76 सेकंदांत पूर्ण करत डायमंड लीग स्पर्धा जिंकली. यंदा मोसमातील त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. बोल्टचा प्रतिस्पर्धी असाफा पॉवेलला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने 9.91 सेकंदांत स्पर्धेचे अंतर पूर्ण केले. तसेच युरोपियन चॅम्पियन क्रिस्टोफ लैमारे (10.4 सेकंद.) तिसर्या स्थानावर राहिला.
महिला गटाच्या 800 मीटरच्या स्पर्धेत इथिओपियाच्या फंटू मागिसोने 1 मि. 57.56 सेकंद घेत सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकासह तिने नव्या विक्रमाची नोंद केली. बोल्टने मागील आठवड्यात ओस्त्रावा येथील स्पर्धेत तीन वर्षांतील सर्वात निराशाजनक कामगिरीचे प्रदर्शन केले होते. त्याने ही स्पर्धा 10.04 सेकंदांत पूर्ण केली होती. या कामगिरीत प्रचंड सुधारणा करत त्याने डायमंड लीगमध्ये आपला सर्वाेत्कृष्ट वेळ काढला.
3000 मीटर- 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये केनियाच्या पॉल किप्सिल कोएचने प्रथम क्रमांकावर धडक मारली. त्याने ही ही स्पर्धा 1.54.31 सेकंदांत पूर्ण करत वर्ल्ड चॅम्पियनचा दावेदार मानल्या जाणार्या एजेकिल केबोइला चौथ्या स्थानावर टाकले.
800 मीटर - इथिओपियाची फंटू मागिसोने महिला गटाच्या 800 मीटर स्पर्धेत सुवर्णवदक पटकावले. तिने हे अंतर 1 मि.57.56 सेकंदांत पूर्ण केले. यामध्ये केनियाची पामेला जेलिमो दुसर्या व वर्ल्ड चॅम्पियन रशियाची मारिया सेविनोवाने तिसरा क्रमांक पटकावला. निराशाजनक कामगिरीमुळे माजी वर्ल्ड चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेची केस्टर सेमेन्यास आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
1500 मीटर- महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत इथिओपियाच्या ही अबिबा अरेगावीने बाजी मारली. 3 मि. 56.54 सेकंदांत हे अंतर पूर्ण करणारी अरेगावी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिचा हा नवा विक्रम आहे.
5000 मीटर - दहा हजार मीटरची वर्ल्ड चॅम्पियन केनियाची विवियन चेरू इयोतने 5000 मीटरची स्पर्धा जिंकली. तिने माजी ऑलिम्पिक चॅम्पियन मेसेरेट डिफरला पिछाडीवर टाकून पहिल्या स्थानावर धडक मारली.
जास्त वेळ काढली झोप!
ओस्त्रावा येथील निराशाजनक कामगिरीची खंत त्याच्या मनाला अधिकच लागली होती. यातून सावरण्यासाठी त्याने रोममध्ये नियमित वेळेपेक्षा अधिक झोप काढली. जास्त झोप काढल्यामुळे मनातील अपयशाचे विचार दूर झाल्याचे तो मानतो. यातूनच रोममधील स्पर्धेत मला सर्वोत्कृष्ट कामगिरी करता आली, असा विश्वासही बोल्टने व्यक्त केला.
विजेते
9.76
से. प्रथम युसेन बोल्ट
9.91
से.द्वितीय असाफा पॉवेल
10.04
से.तृतीय क्रिस्टोफ लैमारे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.