आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Usain Bolt Wins Diamond League Athletics Championship

बोल्टचा होल्ड कायम ! 9.85 सेकंदांत जिंकली 100 मीटरची शर्यत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- शंभर मीटर शर्यतीत आपल्याला तोड नाहीच...जमैकन एक्स्प्रेस युसेन बोल्टने पुन्हा एकदा सिद्ध केले. लंडन येथील डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही तो चॅम्पियन ठरला. त्याने 9.85 सेकंदांत 100 मीटरची शर्यत जिंकत सत्रातील सर्वश्रेष्ठ वेळ काढला. अमेरिकेच्या मिचेल रोडग्रेसने रौप्य जिंकले. त्याने 9.98 सेकंदात शर्यत पूर्ण केली. जमैकाच्या कार्टर नेस्टाला 9.99 सेकंदासह तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. 2012 लंडन ऑलिम्पिकच्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भारताचा विकास गौडाही चमकला. त्याने थाळीफेकमध्ये आठवे स्थान पटकावले.


जमैकाच्या वार्नर वेइरने 200 मीटर धावण्याची शर्यत जिंकली. त्याने 19.08 सेकंदात हे अंतर पूर्ण केले. जमैकाच्या जेसन यंगला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 19.99 सेकंदात निश्चित अंतर गाठले. अमेरिकेचा धावपटू वाल्से स्पेरमोनने (20.18से.) तिसरे स्थान पटकावले.

महिलांच्या 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत चेक गणराज्यच्या झुझाना हेज्नोवाने सुवर्णपदक पटकावले. तिने 53.07 सेकंदात निश्चित अंतर पूर्ण केले. इंग्लंडच्या पेरी शेक-ड्रायटनने दुसर्‍या स्थानावर धडक मारली. तिने ही स्पर्धा 53.67 सेकंदात जिंकली.


विकास गौडा आठव्या स्थानी
आशियाई चॅम्पियन विकास गौडाने डायमंड लीगच्या थाळीफेकमध्ये आठवे स्थान गाठले. त्याने 63.49 मीटर थाळीफेक केली. या गटात पोलंडच्या पीटर मालाचोस्कीने सुवर्णपदक पटकावले. त्याने 67.35 मीटर थाळीफेक केली. इंग्लंडचा मार्टिन वेरीग 66.60 मीटरसह दुसर्‍या स्थानी राहिला.