आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युसेन बोल्टची गोलंदाजी पाहून मी भारावलो - हरभजनसिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील क्रीडाविश्वातील दोन दिग्गजांशी दोन महनि्यांत जवळून संवाद साधण्याचे आलेले योग या जीवनातील फार मोठ्या संधी असल्याचे भारताचा प्रख्यात गोलंदाज हरभजनसिंग याने म्हटले आहे.

फुटबॉल विश्वचषकादरम्यान पेले यांच्याशी, तर त्यानंतर महिना-दीड महिन्यात जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बोल्टशी झालेल्या भेटीनंतर त्याने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. बंगळुरूच्या प्रदर्शनी सामन्यात बोल्टने जतिक्या सुंदर शैलीत आणि एखाद्या मुरलेल्या गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी केली, ते बघून मी खरोखरच प्रभावति झाल्याचे हरभजनने म्हटले आहे. गोलंदाजीसाठी धावत येण्याची त्याची अॅक्शन चांगली असणे समजू शकते. मात्र, त्यानंतर त्याने चेंडू ज्या प्रकारे टाकला, ती शैली बघून मला खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला. कारण ती शैली आणि तसा चेंडू टाकणे एखाद्या कसलेल्या जलदगती गोलंदाजालाच जमू शकते, असे भज्जीने नमूद केले.