रोहतक - ग्लासगोमध्ये झालेल्या 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करणा-या हरियाणाच्या सुपुत्रांचे हरियानामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
शासनाकडून रोख बक्षिसे
हरियाणा शासनाने पदक विजेत्या खेळाडूला घवघवीत मदत करण्याचे जाहीर केले आहे. सुवर्णपदक विजेत्यास 1 कोटी रुपये, रौप्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर यामधील काही पुरस्कार विजेत्या खेळाडूंना नौकरीसुध्दा मिळणार आहे.
राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये कुस्ती, बॉक्सिंग आणि भारत्तोलन स्पर्धेत भारताचाच बोलबाला राहिला आहे.
हरियाणा च्या कोणत्या खेळाडूला मिळाले पदके
सुवर्ण : सुशील कुमार, योगेश्वर दत्त, बबीता कुमारी, अमिता दाहिया, विनेश फोगट यांनी कुस्तीमध्ये सुवर्ण पदक मिळविले.
रौप्य: विजेंद्र सिंह(बॉक्सिंग), मनदीप जांगड़ा(बॉक्सिंग), अनीसा सयैद(शूटिंग), ललिता(कुस्ती), बजरंग(कुस्ती), साक्षी मलिक(कुस्ती), सत्यव्रत(कुस्ती) आणि गीतिका जाखड़(कुस्ती) यांनी रौप्य पदक पटकाविले.
कास्य: पिंकी जांगड़ा(बॉक्सिंग)
पुढील स्लाइडवर पाहा, पदक विजेत्यांच्या जंगी स्वागताची छायाचित्रे...