आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uthappa's Century Contributed To Won India A Team

उथप्पाच्या शतकी खेळीने भारतीय अ संघ विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टनम - यजमान भारतीय अ संघाने पहिल्या एकदिवसीय सराव सामन्यात न्यूझीलंडला 6 गड्यांनी पराभूत केले. यासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. रॉबिन उथप्पा (103) व कर्णधार उन्मुक्त चंदच्या (94) धडाकेबाज खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करणार्‍या न्यूझीलंड अ संघाने 49.4 षटकांत 257 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. भारत व न्यूझीलंड दुसरा सराव सामना मंगळवारी होणार आहे.

आदित्य तारे-उथप्पाने द 48 धावांची भागीदारी केली. मात्र, मिलानेने उथप्पाला झेलबाद केले. तारे (37) व केदार जाधव (15) यांनी अभेद्य 26 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करणार्‍या न्यूझीलंडला 257 धावांपर्यंत मजल मारता आली. धवल कुलकर्णी (3/38), राहुल शर्मा (3/45) आणि अशोक मनेरिया (3/43) यांनी धारदार गोलंदाजी करून पाहुण्या टीमची दमछाक केली. मिटचेलने 51 धावांची खेळी केली.