‘गुणवत्ता सिद्ध करायला / ‘गुणवत्ता सिद्ध करायला आवडते’, लक्ष्‍मणची 'व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल' मुलाखत

स्पोर्ट्स ब्युरो

Dec 20,2011 03:43:01 AM IST

मुंबई - प्रबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपली गुणवत्ता सिद्ध करायला मला नेहमीच आवडते. बहुतेक ऑस्ट्रेलियन संघांविरुद्ध मी खेळलो. त्या संघात दिग्गज खेळाडू होते. त्यांचे आव्हान स्वीकारणे हेच एक मोठे आव्हान होते. मात्र, अशा आव्हानांनीच माझ्यातील सर्वोत्तम गुणवत्ता फुलवण्यासाठी मला प्रेरक शक्ती दिली, असे ‘विस्डेन एक्स्ट्रा’ला दिलेल्या मुलाखतीत व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 25 कसोटींमधील लक्ष्मणच्या धावांची सरासरी आहे 55.58. 2001मध्ये कोलकाता कसोटीत काढलेल्या 281 धावांच्या सर्वोत्तम खेळीचाही त्यात समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील एकूण 11 कसोटींमध्ये लक्ष्मणने एकूण 4 शतके झळकावली असून त्यापैकी तीन शतके (167, 178, 109) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झळकावलेली आहेत.
ऑस्ट्रेलियातील मैदाने आणि खेळपट्ट्या याबाबत मत व्यक्त करताना लक्ष्मण म्हणाला, ‘चेंडू बॅटवर चांगला येतो, अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजी करायला मला आवडते. जेथे वेग व उसळी आहे, अशा खेळपट्ट्यांवर फटके खेळायला मजा येते. ऑस्ट्रेलियन मैदाने, त्यांचे आऊटफील्ड वेगवान आहे. त्यामुळे चांगल्या फटक्यांचा लाभ तुम्हाला पुरेपूर मिळतो. कारण चेंडू वेगात सीमारेषेपलीकडे जातो. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर अन्य भारतीय फलंदाज चाचपडत असताना लक्ष्मणने मात्र बॅकफूट ड्राइव्ह आणि पुलच्या फटक्यांची सहजगत्या खैरात केली होती.
मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीची ‘बॉक्सिंग डे’ कसोटी होणार आहे त्या मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडवरील लक्ष्मणची सरासरी अगदीच कमी म्हणजे 18.50 एवढी आहे. कोणताही असला तरीही तो संघ तुम्हाला सहजासहजी काहीही मिळू देणार नाही. अगदी 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंचा संघदेखील झगडायला लावतो.

X
COMMENT