आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • V V S Laxman Thinking Of Retirement From Cricket

व्‍ही.व्‍ही.एस. लक्ष्‍मण निवृत्तीच्‍या तयारीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय क्रिकेटचा व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल फलंदाज व्‍ही. व्‍ही. एस. लक्ष्‍मण याने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. हैद्राबाद येथे पत्रकार परिषदेमध्‍ये त्‍याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. तत्‍काळ निवृत्ती घेत आहे, असे त्‍याने जाहीर केले. न्‍युझीलंडविरुद्ध आगामी मालिकेत तो खेळणार नसल्‍याचेही त्‍याने स्‍पष्‍ट केले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या सततच्या मानहानीमुळे तो निवृत्तीचा विचार करत असल्याची चर्चा सुरु झाली होती. येत्या 23 ऑगस्टपासून भारत व न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेनंतर लक्ष्मण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या चर्चेला चांगलाच ऊत आला होता.
भारतीय क्रिकेट संघाचा संकटमोचक म्‍हणून लक्ष्‍मणने अनेक सामन्‍यांमध्‍ये मोलाची कामगिरी केली आहे. मनगटाचा जादूगर म्‍हणून लक्ष्‍मणला ओळखले जायचे. मनगटाचा वापर करुन ऑफ स्‍टंपच्‍या बाहेरील चेंडू स्‍क्‍वेअर लेगपर्यंतच्‍या क्षेत्रात कुठेही खेळण्‍याची त्‍याची क्षमता अफलातून होती. कोणत्‍याही क्रमांकावर तो खेळण्‍यासाठी तयार होता. सलामीपासून ते सहाव्‍या क्रमांकावर त्‍याने फलंदाजी केली आहे.
20 नोव्हेंबर 1996 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यातून लक्ष्मणने आपल्या कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 134 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 17 शतके व 56 अर्धशतके ठोकली आहेत. 281 ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली आहे. त्याप्रमाणे त्याने 86 वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 2338 धावा आहेत. 'व्हेरी व्हेरी स्पेशल' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मणची गेल्या काही दिवसांपासून संघामध्ये घुसमट होत असल्याचे बोलले जात होते.

ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी
लक्ष्‍मणने ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऐतिहासिक कोलकाता कसोटीमध्‍ये त्‍याच्‍या 281 धावांच्‍या खेळीमुळे त्‍या मालिकेला कलाटणी मिळाली होती. ती खेळी अजूनही चाहत्‍यांच्‍या स्‍मृतित कायम आहे. ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध त्‍याने 29 कसोटीत 2434 धावा काढल्‍या. लक्ष्‍मणने तळाच्‍या फलंदाजांना हाताशी घेऊन भारताला अनेक अविस्‍मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
‘गुणवत्ता सिद्ध करायला आवडते’, लक्ष्‍मणची 'व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल' मुलाखत
\'तेंडूलकर, द्रविड, लक्ष्मणला संघातून तत्काळ काढून टाका\'
संघाच्‍या पराभवास सचिन,लक्ष्‍मण आणि द्रविड जबाबदार!
लक्ष्‍मण वादाच्‍या भोवऱ्यात, बॅटवर व्‍हॅसलीन लावल्‍याचा आरोप