आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड गेम्समध्ये वासुदेव राजपूत पाचव्या स्थानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बेलफास्ट (लंडन) येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अ‍ॅँड फायर गेम्समध्ये औरंगाबादचे पोलिस नाईक वासुदेव राजपूत यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला. स्पर्धेत एकूण 54 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. 47 वर्षीय राजपूत यांनी 40 ते 49 किलो वजन गटात ही कामगिरी साधली. या स्पर्धेत महाराष्‍ट्रपोलिसतर्फे दोन खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड झाली होती. यामध्ये जालन्याच्या किशोर डांगेचा समावेश होता. त्याने सुवर्णपदक पटकावले. राजपूत यांच्या यशाबद्दल पोलिस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त सोमनाथ घार्गे, डॉ. जय जाधव, अरविंद चावरिया, रामेश्वर थोरात यांनी अभिनंदन केले.