आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पॅरिस- फ्रेंच ओपन टेनिसच्या पहिल्याच फेरीत बाद होणा-या सेरेना विल्यम्सनंतर तिची मोठी बहीण आणि विजेतेपदाची प्रबळ दावेदार व्हिनस विल्यम्सही स्पर्धेतून बाहेर पडली आहे. दुस-या फेरीत तिला पोलंडच्या एग्निसज्का राद्वांस्काने सरळ सेटमध्ये पराभूत केले.
विश्व रँकिंगमध्ये 31 व्या स्थानी असलेली व्हिनस फक्त एका तासात पराभूत झाली. राद्वांस्काने तिला 6-2,6-3 असे पराभूत केले.
गेल्या चार वर्षांत प्रथमच व्हिनसने आपली बहीण सेरेनापेक्षा चांगले प्रदर्शन केले. परंतु, व्हिनसचा हा प्रवास दुस-या फेरीतच संपला.
2008मध्ये सेरेनाने व्हिनस विल्यम्सला विंबल्डनमध्ये पराभूत केले होते. तेव्हापासून सेरेना व्हिनसपेक्षा चांगले प्रदर्शन करीत आली आहे. परंतु, हा सिलसिला यावर्षी संपला.
राद्वांस्काने पहिला सेट सहजच जिंकला. सातवेळा ग्रँड स्लॅम चँपियन ठरलेल्या व्हिनसने फक्त 28 मिनिटात पहिला सेट गमावला. दुस-या सेटमध्ये व्हिनसने थोडा संघर्ष केला. तरीसुद्धा तिला आपला पराभव काही वाचवता आला नाही. राद्वांस्काने दुसरा सेटही आपल्या नावे करून तिस-या फेरीत सहज प्रवेश केला. फोटोमध्ये राद्वांस्काने कसा केला व्हिनसचा पराभव...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.