आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venus Williams Wins Dubai Duty Free Tennis Championships News In Amrathi

व्हीनसने तिसर्‍यांदा पटकावला दुबई ओपन चषक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - जगातील माजी नंबर वन व्हीनस विल्यम्सने यंदाच्या सत्रातील पहिल्या किताबावर नाव कोरले. तिने दुबई ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. याशिवाय तिने तिसर्‍यांदा दुबई ओपनचे अजिंक्यपद आपल्या नावे केले. यापूर्वी तिने 2009 आणि 2010 मध्ये सलग दोन वर्षे या स्पर्धेची फायनल जिंकली होती. अमेरिकेच्या व्हीनसने एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या एलिझा कार्नेटला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. तिने 6-3, 6-0 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. यासह तिचे हे करिअरमधील 45 वे विजेतेपद ठरले. नुकतेच जागतिक क्रमवारीत व्हीनसने प्रगती साधली. तिने 29 व्या स्थानी धडक मारली. यापूर्वी ती 44 व्या स्थानावरून खेळत होती.

नदाल फायनलमध्ये दाखल
जगातील नंबर वन आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा उपविजेता राफेल नदालने रिओ ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. आता त्याचा सामना युक्रेनच्या अलेक्सांद्र डोलगोपोलोवशी होईल. स्पेनच्या नदालने पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत पाब्लो एंडुजारला पराभूत केले. त्याने 2-6, 6-3, 7-6 अशा फरकाने सामना जिंकला.

सेरेनाच्या पराभवाचा घेतला बदला
लहान बहीण आणि जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सच्या उपांत्य लढतीतील पराभवाचा बदला व्हीनसने घेतला. बिगरमानांकित एलिझा कार्नेटने सेरेनाला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून उपांत्य लढतीत सनसनाटी विजय मिळवला होता. यासह तिने अंतिम फेरीतील प्रवेशही निश्चित केला होता. मात्र, तिला व्हीनसनेही सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. त्यामुळे कार्नेटला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.