आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Good Film On Milkha Singh, But When On Dhoni ?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिल्खावर स्तुत्य चित्रपट, ‘धोनी’वर केव्हा ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी मला एका टीव्ही चॅनलवर राकेश ओमप्रकाश मेहरा यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी त्यांनी ‘भाग मिल्खा भाग’ वर काम करण्यास सुरुवात केली होती. त्या वेळी चित्रपटाबाबत ठामपणे काहीही सांगण्याच्या स्थितीत ते नव्हते. धीर धरा आणि चित्रपट बघा, असे त्यांनी म्हटले होते.


मिल्खा एक जिवंत दंतकथा आहे. त्यांच्यावरील चित्रपट यशस्वी होईल की नाही, हे दोन वर्षांपूर्वी सांगणे कठीण होते. आत्मकथेवर चित्रपट तयार करणे, तसेही कठीणच असते. हो, डॉक्यूमेंटरी चित्रपट तयार केला आणि सत्य परिस्थितीला समर्थपणे सादर केले तर चाहते ते पसंत करतात. याच सत्याला चित्रपटात बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला थोडे मनोरंजक स्वरूप देणे आवश्यक असते. हे सर्व व्यावसायिकरीत्या स्वीकारावे लागते. शिवाय हे काम आव्हानात्मकही असते.


क्रीडा महर्षीच्या आत्मकथेवर चित्रीकरण करताना सर्वांत मोठे आव्हान सत्य समोर आणणे आणि अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे सर्वांत कठीण आव्हान असते. राकेश ओमप्रकाश मेहरा यांची स्तुती करावी लागेल. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे मिल्खावर चित्रीकरण केले. फरहान अख्तरनेसुद्धा मिल्खाच्या भूमिकेला न्याय दिला. मी प्रसून जोशी यांचीसुद्धा स्तुती करू इच्छितो, त्यांनी अत्यंत जोशात संवाद लिहून चित्रपटात प्राण ओतले.


रोम ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापासून मिल्खा सिंग सेकंदाच्या शंभराव्या भागाने मागे राहिले असले तरीही आणि त्यांनी चौथे स्थान मिळवले असले तरीही भारतीय क्रीडा दुनियेतील ते एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. मिल्खा रोममध्ये हरले असले तरीही सर्व भारतीयांच्या मनात त्यांना स्थान आहे, असे मी प्रसून जोशी यांना म्हटले होते. पराभूत होऊनसुद्धा ते हीरो होते. कारण, त्यांनी मिळवलेले यश खूप आहे. अखेर रोम ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्यानंतर पाकिस्तानात झालेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील सहभाग आणि फ्लाइंग शीखची पदवी मिळवणे या सर्व संस्मरणीय घटना आहेत. चित्रपटाबद्दल माझे आकलन एका क्रीडाप्रेमीसारखेच आहे. या चित्रपटाशी संबंधित मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘चक दे इंडिया’ बघितल्यानंतर एखाद्या क्रीडा महर्षीवर चित्रपट झाल्यास त्याच्यावर मुळीच अन्याय होणार नाही, असे मला वाटत होते.


भारतात इतर खेळातही अनेक सुपरस्टार आहेत, ज्यांच्यावर चित्रपट निघू शकतो. एमसी मेरिकॉमवर संजय लीला भन्साळी चित्रपट तयार करीत आहेत. मात्र, मेजर ध्यानचंद, लाला अमरनाथ, पीटी उषा, मो. अझरुद्दीन आणि विनोद कांबळीवरही चित्रपटू बनू शकतो. महेंद्रसिंग धोनीवर तर चित्रपट बनलाच पाहिजे. दहा वर्षांपूर्वी दक्षिण पूर्व रेल्वेत तिकीट कलेक्टर असलेल्या या प्रतिभावंत क्रिकेटपटूने एका दशकात जगातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. रांचीचा माही आणि इतर दिग्गजांवरही चित्रपट निघेल, अशी आशा आहे.