आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Declared Very Precious Player Award To Mery Kom

सॅमसंगचा मेरी कोमला सर्वाधिक बहुमूल्य खेळाडूचा पुरस्कार प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसाठी सॅमसंगकडून आयोजित सत्कार सोहळ्यात महिला बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोमला सॅमसंगने "सर्वाधिक बहुमूल्य खेळाडू'चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराच्या रूपात तिला १० लाख रुपयांचा चेक भेट देण्यात आला. पत्रकार आणि सोशल मीडियाच्या सल्ल्यानंतर मेरी कोमच्या नावाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.

हा पुरस्कार स्वीकारताना मेरीने आपले मनोगत व्यक्त केले. मेरी म्हणाली, "मी इंचियोन एशियाडमध्ये सुवर्णपदकाच्या लढाईसाठी रिंगमध्ये उतरले त्या वेळी माझ्यावर जिंकण्याचा किंवा पराभवाच्या भीतीचा कसलाही दबाव नव्हता. माझे एकच लक्ष्य होते, ते म्हणजे देशासाठी आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणे. महिलांना खेळात खूप कमी संधी मिळते. इतकेच काय तर महिला खेळाडूंना कुटुंब आणि समाजाकडूनसुद्धा पूर्ण सुविधा, पाठिंबा मिळत नाही. महिलांबाबत समाजात पसरलेली ही भावना बदलणे गरजेचे आहे. महिलांना दुजाभाव देण्याची वृत्ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अधिक मेडल मिळणार नाहीत,' असेही ती म्हणाली.

पदकविजेत्यांना बक्षीस
सॅमसंगने या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंना सॅमसंग गॅलेक्सी एस-५ देऊन सन्मानित केले. भारताने इंचियोनमध्ये ११ सुवर्णांसह एकूण ५७ पदके जिंकली होती. भारताने मागच्या आशियाई स्पर्धेत १४ सुवर्णांसह ६५ पदके जिंकली होती. इंचियोनमध्ये सॅमसंग खेलरत्नपैकी सहा खेळाडूंनी देशासाठी पदक जिंकले. यात योगेश्वर दत्त, मेरी कोम, अभिनव बिंद्रा, विनेश फोगाट, पी. व्ही. सिंधू यांचा समावेश आहे.