आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: शिखर धवन लवकरच आयपीएलमध्ये दिसणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या काही सामन्यांना मुकणारा सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर शिखर धवन लवकरच मैदानावर परतू शकतो. नॅशनल क्रिकेट अकादमीकडून त्याला लवकरच खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळू शकतो. मेलबर्न येथे उपचार घेऊन भारताचा हा 27 वर्षीय फलंदाज नुकताच मायदेशी परतला आहे. ‘शिखर धवन येत्या 10 दिवसांत मैदानावर खेळू शकेल, अशी आम्हाला आशा आहे,’ अशा आशयाचे ट्विट सनरायझर्सचे कोच टॉम मुडी यांनी केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीदरम्यान शिखर धवनच्या बोटाला दुखापत झाली होती. या कसोटीत त्याने 187 धावांची ऐतिहासिक पदार्पणातील खेळी केली होती. यानंतर दुखापतीमुळे तो सहा आठवडे क्रिकेटच्या मैदानापासून दूर झाला.