आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच विजेंदर सिंग झळकणार रुपेरी पडद्यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जप्रकरणी चर्चेत असलेला बॉक्सर विजेंदर सिंग आता एका नव्या रूपात चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तो लवकरच सिनेअभिनेता अक्षयकुमारच्या सोशल-थ्रीलर चित्रपटात काम करणार आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगला रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. आगामी ‘फुगली’ नावाचा चित्रपट तो साइन करणार आहे. अक्षयकुमार व आश्विनी यार्दी यांची ‘ग्राझिंग गोट पिचर्स’ या प्रोडक्शन कंपनीने चित्रपटाची जबाबदारी स्वीकारली आहे. येत्या ऑगस्टपासून चित्रीकरणाला प्रारंभ होईल.


या चित्रपटाचे दिगदर्शन कबीर सदानंद करणार आहेत. या विषयी कबीर म्हणाले की, आमच्या आगामी चित्रपटात विजेंदर सिंग अभिनय करणार आहे. हा एक सोशल-थ्रीलर असा चित्रपट आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी विजेंदर हा योग्य असा कलाकार आहे. यासाठी तो अभिनयाच्या कार्यशाळेतही सहभागी होणार आहे. या चित्रपटाच्या कथानकाविषयी मात्र, त्यांनी बोलण्यास टाळले.