आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Well Performance Of Rohit And Rahane In Practics Match

सराव सामन्यात रोहित, रहाणे चमकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वानगरेई - दोनदिवसीय क्रिकेट सराव सामन्यात भारताच्या मधल्या फळीने दमदार फलंदाजी करून पहिल्या कसोटीसाठी आशा पल्लवित केल्या. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे (60), कर्णधार रोहित शर्मा (59) आणि अंबाती रायडूने (नाबाद 49) धावा काढल्या. ड्रॉ झालेल्या सामन्यात भारताने 7 बाद 313 धावा काढल्या. तत्पूर्वी या सामन्यात न्यूझीलंड एकादशने रविवारी 9 बाद 262 धावा काढून डाव घोषित केला होता. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 6 फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना रंगणार आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा युवा स्फोटक फलंदाज शिखर धवनने आपल्या कामगिरीने निराश केले. धवनला फक्त 26 धावा काढता आल्या. मुरली विजयने 19 आणि चेतेश्वर पुजाराने 33 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी भारतीय संघाने रविवारी 41 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सकाळी मुरली विजय आणि धवन लवकर बाद झाले. यानंतर तिस-या विकेटसाठी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी 99 धावांची भागीदारी केली. सातव्या विकेटसाठी रायडू आणि आर. अश्विन यांनी 66 धावा जोडून भारताचा स्कोअर तीनशेच्या पुढे पोहोचवला.
रोहित शर्माने 101 चेंडूंचा सामना करताना 7 चौकारांच्या मदतीने 59 धावा काढल्या. पुढच्या फलंदाजांना संधी मिळावी म्हणून अर्धशतकानंतर रोहित स्वत:हून निवृत्त झाला. 60 धावा झाल्यानंतर रहाणेसुद्धा निवृत्त झाला. अजिंक्य रहाणेने 97 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 5 चौकारांचा सामना केला. मधल्या फळीचा युवा खेळाडू अंबाती रायडूने नाबाद 49 धावांचे योगदान दिले. रायडूने 93 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले. वृद्धिमान साहाला (4) मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही.
सामन्यातून जे साध्य करायचे होते ते मिळाले
४ पहिल्या कसोटी सामन्यासाठी जितका सराव आम्हाला मिळायला हवा होता, तितका या सराव सामन्यातून मिळाला. प्रत्येक फलंदाजाला मैदानावर उतरून स्वत:ला कसोटीच्या साच्यात बसवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. प्रत्येकानेच काही धावा केल्याने हा सराव कसोटीत उपयुक्त ठरला. अश्विनने बॅट आणि बॉलसह चांगली कामगिरी बजावली. रायडूनेदेखील 49 धावांची उपयुक्त खेळी केली.
- रोहित शर्मा, प्रभारी कर्णधार.
धावफलक
न्यूझीलंड एकादश : 9/262.
भारत धावा चेंडू 4 6
मुरली विजय त्रि. गो. टुगागा 19 56 1 0
शिखर धवन धावबाद 26 68 4 0
पुजारा पायचित गो. बेडेनहॉर्स्ट 33 66 4 0
रोहित शर्मा (निवृत्त) 59 101 7 0
अजिंक्य रहाणे (निवृत्त) 60 97 5 1
अंबाती रायडू नाबाद 49 93 5 0
वृद्धिमान साहा त्रि. गो. बोल्ट 04 18 0 0
आर. अश्विन त्रि. गो. हिक्स 46 51 6 2
भुवनेश्वर कुमार नाबाद 03 10 0 0
अवांतर : 14. एकूण : 93 षटकांत 7 बाद 313 धावा. गोलंदाजी : फ्रायडे 25-5-86-0, टुगागा 16-4-56-1, मॅकपिके 12-2-35-0, बोल्ट 18-2-74-1, बेडेनहॉर्स्ट 16-4-38-1, डेविच 2-0-3-0, वॉर्कर 2-0-4-0, हिक्स 2-0-8-1.