आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेलबर्न- बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने चीनच्या ली नाला पराभूत करून ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीच्या चषकावर आपले नाव कोरले आहे. तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात अजारेंकाने ली नाला 4-6, 6-4, 6-3 ने पराभूत केले.
कमकूवत प्रदर्शन
दुस-या सेटदरम्यान चीनची ली जायबंदी झाली होती. त्यामुळे तिला दोन वेळा आपल्या फिजिओला बोलवावे लागले. पण त्यानंतर ली नाने सामना संपवण्यासाठी संघर्ष केला. मात्र सामना जिंकण्यास तिचा संघर्ष अपुरा ठरला.
उल्लेखनीय म्हणजे 2011 सालच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिमफेरीतही ली ना पोहचली होती. त्यावेळी बेल्जियमच्या किम क्लाइस्टार्सच्या हातून पराभव पत्करावा लागला होता. या विजयामुळे अजारेंकाला जागतिक क्रमवारीतील आपले स्थानही कायम राखता आलेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.