आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्‍या महाशतकाची थट्टा, पाहा व्हिडिओ...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानी माध्‍यमांनी सचिनच्‍या महाशतकावरून थट्टा सुरू केली आहे. पा‍किस्‍तानच्‍या 'जियो न्‍यूज' या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्‍या एका व्हिडिओमध्‍ये सचिन आणि पाकिस्‍तानचा माजी कर्णधार इमरान खान यांना फोनवरून बोलताना दाखवण्‍यात आले आहे. यामध्‍ये सचिन आपल्‍या शंभराव्‍या शतकासाठी इमरान खानकडे टीप्‍स विचारतो. सचिनला जर टीप्‍स पाहिजे असेल तर त्‍याने आपल्‍या पक्षात प्रवेश करावा, अशी अट इमरान खान ठेवतो.

इमरान सचिनला आपल्‍या 'तहरीक ए इन्‍साफ' या पक्षाचे 99 सदस्‍य आहेत, असे सांगताना व्हिडिओमध्‍ये दाखवले आहे. जर तो आपल्‍या पक्षात आला तर सदस्‍य संख्‍या 100 होईल, असेही तो सचिनला म्‍हणतो. पाहा व्हिडिओ...